Thursday, November 21, 2024
Homeमहाराष्ट्रकधी आणि किती वाजता येणार महाराष्ट्र विधानसभेचे एक्झिट पोल?; कुठे पाहाल?

कधी आणि किती वाजता येणार महाराष्ट्र विधानसभेचे एक्झिट पोल?; कुठे पाहाल?

महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघासाठी आज ( 20 नोव्हेंबर) एका टप्प्यात मतदान होत आहे. त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी महाराष्ट्रातील विधानसभेचं चित्र स्पष्ट होणार आहे. राज्यात महायुतीचे सरकार येणार की महाविकास आघाडीचे की इतरांच्या मदतीने कुणाचे सरकार येणार हे स्पष्ट होणार आहे.

त्यामुळे या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्यातील 288 जागांवर एकूण 4136 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. आज राज्यात सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होईल. त्यानंतर संध्याकाळी 6.30 वाजेच्या सुमारास एक्झिट पोल यायला सुरुवात होणार आहे.

 

एक्झिट पोल अनेकदा खरे ठरतात. काही वेळा एक्झिट पोलच्या उलटाही निकाल लागतो. पण तरीही नागरिकांमध्ये एक्झिट पोलची उत्सुकता असते. निवडणुकीच्या दिवशी काय निकाल येईल याचा एक ढोबळ अंदाज या एक्झिटपोलमधून येत असतो. यावेळी महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -