महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळवलेलं आहे. भाजपने अभूतपूर्व यश मिळालेलं आहे. भाजपच्या या प्रचंड यश मिळवल्यानंतर भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत या विजयासाठी महाराष्ट्राचे आभार मानले आहेत. एक है तो ‘सेफ’ है ! मोदी है तो मुमकिन हैं !, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलेलं आहे. महाराष्ट्रात 220 जागांवर महायुती आघाडीवर आहे. त्यापैकी 126 जागांवर भाजप विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. तर महाविकास आघाडीला केवळ 50 जागा मिळताना दिसत आहेत.
अमित शाह यांच्याकडून फोन करून अभिनंदन
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच देवेंद्र फडणवीस यांनाही फोन करत अमित शाह यांनी विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी देखील फोन करत देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलेलं आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी फोन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलेलं आहे.
अजित पवारांचं ट्विट काय?
महाराष्ट्राने गुलाबी रंग निवडला, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. Maharashtra Chooses Pink, असं ट्विट अजित पवार यांनी म्हटलं आहे.ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मात्र या निकालाचा निषेध केलेला आहे. फेसबुक पोस्ट लिहित संजय राऊत यांनी हा निकाल मान्य नसल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्राचं वातावरण, कल ज्या पद्धतीने होता, आम्ही ग्राऊंडवर जमिनीवर होतो. निकाल आल्यानंतर लोकशाहीच कौल, प्रथा मानण्याची परंपरा आहे. आम्ही ती पाळलेली आहे. पण हा कौल कसा मानावा असा प्रश्न राज्यातील जनतेला पडलेला आहे, असं संजय राऊत म्हणालेत.
संजय राऊतांचं ट्विट
Ballet paper (मत पत्रिका) वर पुन्हा निवडणुका घ्या. महाराष्ट्राचा निकाल हा जनमताचा कौल नाही.नाही! नाही! त्रिवार नाही! असा निकाल लागूच शकत नाही.