मेगा ऑक्शनचा पहिला दिवस संपला
मेगा ऑक्शनचा पहिला दिवस संपला. पहिल्या दिवशी 84 खेळाडूंवर बोली लावण्यात आली. 84 पैकी 72 खेळाडूंना विविध संघांनी घेतलं. तर 12 खेळाडू अनसोल्ड राहिले.
अनकॅप्ड स्पिनर, पीयूष चावला अनसोल्ड
आरसीबीने सुयश शर्मा याच्यासाठी 2 कोटी 60 लाख रुपये मोजले.
मुंबईने कर्ण शर्मासाठी 50 लाख रुपये मोजले.
मयंक मार्कंडे याला केकेआरने 30 लाख या बेस प्राईजमध्ये घेतलं.
टीम इंडियाचा माजी स्पिनर पीयूष चावला अनसोल्ड राहिला.
कार्तिकेय सिंह याला राजस्थानकडून 30 लाख रुपयांमध्ये घेण्यात आलं.
गुजरातने मानव सुथार याला 30 लाख या बेस प्राईजमध्ये घेतलं.
श्रेयस गोपाळ अनसोल्ड राहिला.
अनकॅप्ड फास्टर बॉलर, कोणाला लॉटरी?
आरसीबीकडून रसीख डार याच्यावर 2 कोटींची बोली लावण्यात आली. दिल्लीकडून रसीखसाठी आरटीएमचा वापर करण्यात आला. आरसीबीने 6 कोटींचा प्रस्ताव ठेवला. मात्र दिल्लीने माघार घेतली आणि रसीख आरसीबीचा झाला.
राजस्थानने आकाश मधवाल याला 1 कोटी 20 लाख रुपयांमध्ये घेतलं.
दिल्लीने मोहित शर्मा याला 2.20 कोटींमध्ये आपल्या ताफ्यात घेतलं.
पंजाबने विजयकुमार वैशाख याला 1.80 कोटींमध्ये आपल्या ताफ्यात घेतलं.
केकेआरने वैभव अरोडा याला 1.80 कोटींमध्ये आपल्या ताफ्यात घेतलं.
यश ठाकुर याला पंजाबने घेतलं. पंजाबने यशसाठी 1.60 कोटी मोजले.
हैदराबादने सिमरजीत सिंह याला 1 कोटी 50 लाख रुपयांमध्ये घेतलं.
कार्तिक त्यागी अनसोल्ड राहिला.
अनकॅप्ड विकेटकीपर, सर्वात महागडा कोण?
कुमार कुशाग्र याच्यासाठी गुजरातने 65 लाख मोजले.
रॉबिन मिंज याला मुंबईने 65 लाख रुपयात आपल्याकडे घेतलं.
बंगळुरुने अनुज रावत याला 30 लाख बेस प्राईजमध्ये घेतलं.
लखनऊने आर्यन जुयाल याला 30 लाख बेस प्राईजमध्ये घेतलं.
विष्णु विनोद याला पंजाब किंग्सने 95 लाख या किंमतीत आपल्या ताफ्यात घेतलं.
उपेंद्र यादव आणि लवनथी सिसोदीया अनसोल्ड राहिले.
अनकॅप्ड ऑलराउंडर, सर्वात महागडा कोण?
गुजरात टायटन्सने निशांत सिंधूला 30 लाख या बेस प्राईजमध्ये आपल्या ताफ्यात घेतलं.
समीर रिझवी याला दिल्लीने 95 लाख रुपयांमध्ये घेतलं.
नमन धीर याच्यासाठी राजस्थानने 3.40 कोटींची बोली लावली. मात्र मुंबईने नमनसाठी आरटीएमचा वापर केला. राजस्थानने नमनसाठी 5.25 कोटींची अंतिम बोली लावली. मुंबईने राजस्थानचा हा प्रस्ताव मान्य केला. नमनची अशाप्रकारे घरवापसी झाली.
अब्दुल समदसाठी लखनऊने 4.20 कोटी मोजले.
हरप्रीत ब्रार याला पंजाबने 1.50 कोटींमध्ये आपल्याकडे घेतलं.
चेन्नईने विजय शंकर याला 1.20 कोटींमध्ये घेतलं.
महिपाल लोमरुरला गुजरातने 1.70 कोटींमध्ये घेतलं. आरसीबीने लोमरुरसाठी आरटीएम वापरण्यात स्वारस्य दाखवलं नाही.
दिल्लीने आशुतोष शर्माला 3.80 कोटींमध्ये आपल्या ताफ्यात घेतलं.
उत्कर्ष सिंह अनसोल्ड राहिला. उत्कर्षची बेस प्राईज 30 लाख रुपये होती.