Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्ररेशनकार्ड धारकांना केवळ 450 रुपयात मिळणार गॅस सिलेंडर; जाणून घ्या पात्रता

रेशनकार्ड धारकांना केवळ 450 रुपयात मिळणार गॅस सिलेंडर; जाणून घ्या पात्रता

केंद्र सरकारने नागरिकांसाठी विविध योजना आणलेल्या आहे. ज्याचा फायदा आजपर्यंत देशातील लाखो लोकांना झालेला आहे. यातीलच गरीब लोकांना कमीत कमी किमतीमध्ये जीवनावश्यक वस्तू मिळत आहेत. यासाठी सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्या अंतर्गत कमी किमतीत रेशन दिलेले जाते. परंतु हे रेशन घेण्यासाठी सामान्य नागरिकांकडे रेशन कार्ड असणे खूप गरजेचे आहे

 

अशातच आता रेशन कार्ड धारकांना केवळ 450 रुपयांमध्ये सिलेंडर मिळणार आहे. राजस्थान मधील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यांना अगदी कमी किमतीमध्ये सिलेंडर खरेदी करता येणार आहे. तसेच दारिद्र्य रेषेखाली असलेल्या लोकांना स्वस्त धान्य मिळते. परंतु त्यांच्याकडे शिधापत्रिका असणे गरजेचे आहे. सरकारकडून आता 450 रुपयांनी गॅस सिलेंडर मिळणार आहे. रेशन कार्डबाबत ही एक मोठी घोषणा केलेली आहे.

 

राजस्थान मधील उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 450 रुपयांमध्ये सिलेंडर केले जाणार आहे. यासाठी रेशन कार्ड आणि एलपीजी आयडी लिंक असणे गरजेचे आहे. राजस्थान मधील एक कोटी पेक्षा जास्त कुटुंबीय हे राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत लाभ घेत आहेत. आणि यांपैकी 37 लाख कुटुंबांना 450 रुपयांमध्ये गॅस सिलेंडर मिळणार आहे. त्यामुळे स्वस्त धान्य सोबत आता नागरिकांना सिलेंडर देखील कमी किमतीत मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -