भारताने पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड दिला आहे. पर्थच्या ऑप्टस स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह टीम इंडियाने अनेक विक्रम रचले आहेत.
ऑस्ट्रेलियाला पर्थमध्ये पराभूत करणारा टीम इंडिया हा पहिला संघ ठरला आहे. पर्थमध्ये कसोटी ऑस्ट्रेलियाने एकाही पराभवाचं तोंड पाहिलं नव्हतं. टीम इंडियाने ही प्रथा मोडत पहिला विजय मिळवला आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडियाने कसोटीतील सर्वात मोठा विजय मिळवला आहे. 1977 मध्ये भारतीय संघाने मेलबर्न कसोटीत 222 धावांनी विजय मिळवला होता. आता 47 वर्षानंतर भारताने 295 धावांनी विजय मिळवला आहे.
आशिया खंडाबाहेर टीम इंडियाचा हा दुसरा मोठा विजय आहे. यापूर्वी 2019 मध्ये वेस्ट इंडिजला 318 धावांनी पराभूत केलं आहे. आता 295 धावांनी विजय मिळवला आहे.
वर्ष 2000 नंतर ऑस्ट्रेलियात सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम टीम इंडियाच्या नावावर आहे. यापूर्वी हा विक्रम दक्षिण अफ्रिकेच्या नावावर होता. सातव्या विजयासह भारताने या यादीत अव्वल स्थान पटकावलं