Wednesday, December 11, 2024
Homeक्रीडाविराट-रोहितला तिसऱ्या कसोटीआधी झटका, आयसीसीकडून मोठी कारवाई

विराट-रोहितला तिसऱ्या कसोटीआधी झटका, आयसीसीकडून मोठी कारवाई

टीम इंडिया बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2024-25 साठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील कसोटी मालिकेत उभयसंघात एकूण 5 सामने खेळवण्यात येणार आहेत. ही मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. टीम इंडियाने मालिकेत विजयी सलामी दिली होती. मात्र ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सामन्यात कमबॅक करत मालिकेत बरोबरी साधली. अपवाद वगळता टीम इंडियाचे खेळाडू या दुसऱ्या सामन्यात सपशेल अपयशी ठरले. त्याचाच फटका या खेळाडूंना बसला आहे. या सामन्यात अपयशी ठरलेल्या खेळाडूंवर आयसीसीने मोठी कारवाई केली आहे. आयसीसीने ताजी कसोटी क्रमवारी जारी केली आहे. यामध्ये मोठी उलथापालथ झाली आहे.

 

आयसीसी कसोटी क्रमवारीत इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूक याने सहकारी जो रुट याला मागे टाकत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. तर रुटची दुसऱ्या स्थानी घसरण झालीय. दोघांमध्ये फक्त 1-1 रेटिंग पॉइंटचा फरक आहे. ब्रूकच्या खात्यात 898 तर रुटच्या नावावर 897 रेटिंग पॉइंट्स आहेत. तर विराट कोहलीची 6 आणि रोहित शर्माची 5 स्थानांनी घसरण झाली आहे. विराटची 14 वरुन थेट 20 व्या स्थानी घसरला आहे. तर रोहित 26 वरुन 31 व्या स्थानी फेकला गेला आहे. तसेच ऋषभ पंत सहाव्या क्रमांकावरुन नवव्या स्थानी घसरला आहे.

 

टीम इंडियाच्या फलंदाजांना दुसऱ्या सामन्यात लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्याचाच फटका या तिघांना बसला आहे. रोहितने कमबॅकनंतर घोर निराशा केली. तर विराट आणि पंत या दोघांनाही मोठी खेळी करता आली नाही.

 

फायदा कुणाला?

यशस्वी जयस्वाल याने त्याचं चौथं स्थान कायम राखलं आहे. टीम इंडियाविरुद्ध शतक करणाऱ्या ट्रेव्हिस हेडने 6 स्थानांची झेप घेतली आहे. हेड 11 वरुन 5 व्या स्थानी पोहचला आहे. हेडच्या खात्यात 781 रेटिंग पॉइंट्स आहेत.

 

 

 

बुमराह नंबर 1

दरम्यान टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने त्याचं सिंहासन कायम राखलंय. बुमराह 890 रेटिंगसह पहिल्या स्थानी कायम आहे. आर अश्विनची चौथ्यावरुन पाचव्या स्थानी घसरण झालीय. तर रवींद्र जडेजा सहाव्या स्थानी कायम आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -