भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा कसोटी सामना गाबास्टेडियममध्ये सुरु आहे. या सामन्यातील तिसरा दिवसाचा खेळ संपला असून भारताने 4 गडी गमवून 51 धावा केल्या आहेत. अजूनही भारत 394 धावांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे भारतीय संघ पराभवाच्या सावटाखाली आहे यात काही शंका नाही. कारण चौथ्या दिवशी भारताच्या विकेट झटपट गेल्या. तर हा सामना वाचवणं खूपच कठीण होईल. त्यामुळे आता सर्व नजरा केएल राहुल आणि कर्णधार रोहित शर्माच्या खेळीकडे लागून आहेत. तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा केएल राहुल नाबाद 33 तर कर्णधार रोहित शर्मा नाबाद 0 धावांवर खेळत आहे. ऑस्ट्रेलियाकडे मोठी आघाडी असेल तर फॉलोऑनमध्येच भारताला पराभवाच्या दरीत ढकलू शकते. असं असताना या सामन्यातील एक व्हिडीओ समोर आला आहे. ऑस्ट्रेलियाचा डाव सुरु असताना कर्णधार रोहित शर्मा वैतागल्याचं दिसत आहे. याचा फटका वेगवान गोलंदाज आकाशदीपला बसला. कारण ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचे सर्वच प्लान फिस्कटून टाकले.
तिसऱ्या दिवशी संघाचं 114 वं षटक रोहित शर्माने आकाशदीपच्या हाती सोपवलं होतं. जेव्हा एलेक्स कॅरी चेंडू कट करण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा आकाशदीपने ऑफ स्टंपच्या बाहेर वाइड चेंडू टाकला. ऋषभ पंतने डाव्या बाजूला उडी घेऊन चौकार जाणारा चेंडू अडवला. पण इतकी मेहनत घेतल्यानंतरही एक अतिरिक्त धाव गेली. यामुळे विकेटकीपरच्या बाजूला उभा असलेला कर्णधार रोहित शर्मा वैतागला. त्याने आकाशदीपला काहीतरी सुनावलं ते सर्व स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झालं. रोहित शर्माने आकाशदीपला सांगितलं की, अरे डोक्यात काही आहे का? रोहित शर्माला वैतागलेला पाहून आकाशदीप अलर्ट झाला आणि पुनरागमन केलं.
आकाशदीपने 118 षटक टाकताना पहिल्याच चेंडूवर एलेक्स कॅरीला बाद केलं. आकाशदीपच्या गोलंदाजीवर शुबमन गिलने त्याचा झेल पकडला. एलेक्स कॅरीने 88 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 70 धावा केल्या. एलेक्सने आकाशदीपच्या गोलंदाजीवर मिड विकेट स्टँडमध्ये एक शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण डीपला उभ्या असलेल्या शुबमन गिलच्या हाती झेल गेला. आकाशदीपने 29.5 षटकं टकाली आणि 95 धावा देत एक गडी बाद केला.