लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.लाडकी बहीण योजनेत आता काही महिलांना ९००० रुपये मिळणार आहेत. (Ladki Bahin Yojana Update)
लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत ५ हप्ते जमा झाले आहेत. आता महिला सहाव्या हप्त्याची वाट बघत आहेत. लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता डिसेंबर महिन्यात येणार आहे. या हप्त्याची तारीख अद्याप समोर आलेली नाही. मात्र, आता ज्या महिलांना सुरुवातीला फॉर्म भरले आहेत आणि त्यांना पैसे आले नाहीत त्यांना एकदम ९००० रुपये येऊ शकतात.
लाडकी बहीण योजनेतील ६ हप्ते एकदम महिलांच्या अकाउंटला जमा केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मिडिया रिपोर्टनुसार,ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्याच्या आधी फॉर्म भरले आहेत आणि त्यांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक नव्हते अशा महिलांना या योजनेत आतापर्यंत पैसे मिळाले नव्हते. मात्र, आता या महिलांना सहा महिन्याचे हप्ते एकदम येऊ शकतात.
डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार? (When will December Month Installment Come)
लाडक्या बहिणींचे लक्ष आता डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे लागले आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा हप्ता खातेवाटपानंतर दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच डिसेंबर महिना संपायला अवघे १०-१२ दिवस उरले आहेत. त्यामुळे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याला हप्ता एकत्र दिला जाणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
२१०० रुपये कधी मिळणार?(When 2100 Rupees Come)
लाडकी बहीण योजनेत महिलांना २१०० रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. याबाबत आदिती तटकरेंनी माहिती दिली आहे. लाडक्या बहिणींनो मार्चपर्यंत थांबा, अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना २१०० रुपये दिले जातील, असं त्यांनी सांगितलं आहे.