Saturday, March 15, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी : मैत्रिणीला चुकीची माहिती देत असल्याच्या कारणावरून युवकावर हल्ला : पाच...

इचलकरंजी : मैत्रिणीला चुकीची माहिती देत असल्याच्या कारणावरून युवकावर हल्ला : पाच जणांवर गुन्हा

इचलकरंजीत नुकताच एका युवकावर सशस्त्र हल्ला करण्यात आला. हा हल्ला एकूण पाच जणांनी केल्याचे समोर आले आहे. त्यानुसार पाच जणांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आली आहेत.

 

या घटनेबाबत अधिक माहिती अशी, मैत्रिणीला चुकीची माहिती देत असल्याच्या गैरसमजातून झालेल्या वादात पाचजणांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात एकजण गंभीर जखमी झाला. इम्रान अल्लाबक्ष विजापुरे (वय २४ रा. वहर गल्ली) असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणी अलोक माने (रा. शाहूनगर गल्ली नं. १०), रोहन लोखंडे (रा. नारळ चौक) व अन्य तिघे अशा पाचजणांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, इम्रान विजापुरे व अलोक माने हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. अलोक हा आपल्या मैत्रिणीला चुकीची माहिती सांगत असल्याबद्दल इम्रान याला गैरसमज होता. याच कारणातून इम्रान आणि अलोक यांच्यात दोन-तीन वेळा वादावादीही झाली होती.

 

याच पूर्वीच्या वादातून गुरुवारी इम्रान हा तीनबत्ती चार रस्ता परिसरातून जात असताना अलोक व त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर हल्ला केला. माझ्याकडे रागाने बघतो, तु अजून मस्ती करतोस, तुला आता सोडत नाही असे म्हणत अलोक याने इम्रान बाला मारहाण सुरु केली. तर रोहन व अन्य तिघांनी लोखंडी पाईपने इम्रानच्या मांडीवर मारुन जखमी केले. तसेच अलोक शस्त्राने इयानच्या छातीच्या खालील बाजूस भोसकले. त्यामध्ये इम्रान हा गंभीर झाला.

 

मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन इम्रान हा बेशुध्द पडल्याने नागरिकांनी त्याला तातडीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी प्राथमिक उपचार करुन जखम खोलवर असल्याने पुढील उपचारासाठी सांगली सिव्हील रुग्णालयाकडे पाठविण्यात आले. या प्रकरणी पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -