Monday, December 30, 2024
Homeमहाराष्ट्रख्रिसमस मार्केटमध्ये कार घुसवून लोकांना चिरडलं, किती ठार? हल्ल्यामागे डॉक्टर

ख्रिसमस मार्केटमध्ये कार घुसवून लोकांना चिरडलं, किती ठार? हल्ल्यामागे डॉक्टर

जर्मनीच्या मॅगडेबर्ग शहरात भीषण हल्ला झाला आहे. एक वेगात आलेली कार नागरिकांची प्रचंड गर्दी असलेल्या बाजारात घुसली. या कारने अक्षरक्ष: लोकांना चिरडलं. या हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. 80 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. नाताळ निमित्त ही बाजारपेठ सजली होती. नाताळ सणाला आता चार दिवस उरले आहेत. म्हणून जर्मनीच्या मॅगडेबर्ग शहरात नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. त्यावेळी ही घटना घडली. जर्मन पोलिसांनी कार चालवणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. तो सौदी अरेबियाचा राहणारा आहे.

 

क्षेत्रीय प्रमुख रेनर हसेलॉफ यांनी या घटनेबद्दल माहिती देताना सांगितलं की, “कार चालक सौदी अरेबियाचा रहिवाशी आहे. त्याचं वय 50 वर्ष असून पेशाने तो डॉक्टर आहे. पूर्वेकडच राज्य सेक्सोनी-एनहाल्टमध्ये तो राहतो” आम्ही गुन्हेगाराला अटक केली असून हा डॉक्टर 2006 पासून जर्मनीमध्ये वास्तव्याला आहे असं रेनर हसेलॉफ यांनी सांगितलं.

 

कसा झाला हल्ला?

स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 7 च्या नंतर बाजार गर्दीने भरलेला होता. त्यावेळी एक काळ्या रंगाची BMW कार प्रचंड वेगात या गर्दीमध्ये घुसली असं परदेशी मीडियाने सुरक्षा सूत्रांच्या हवाल्याने माहिती दिली आहे. “सौदीचा हा माणूस म्यूनिखची लायसन्स प्लेट असलेली भाड्याची कार घेऊन ख्रिसमस मार्केटमध्ये आला होता” अशी माहिती रेनर हसेलॉफ यांनी दिली.

 

ही कार बाजारपेठेत किती मीटरपर्यंत गेली?

 

पोलिसांनी सांगितलं की, आरोपीने ख्रिसमस मार्केटमध्ये ही कार जवळपास 400 मीटरपर्यंत चालवली. केंद्रीय टाऊन हॉलच्या चौकात अनेक जण प्रचंड वेगात आलेल्या या कारमुळे जखमी झाले. ही वेगवान कार मार्केटमध्ये घुसताच नागरिक मोठ्याने ओरडले. स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी लोक मिळेल त्या मार्गाने पळत होते. एकच गोंधळ, गदारोळाची स्थिती होती. 80 पेक्षा जास्त लोक जखमी झाले.

 

चान्सलरने काय म्हटलं?

 

रुग्णावाहिक आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी पोहोचल्या. सध्या सगळ्या जखमींवर उपचार सुरु आहेत. जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्ज यांनी या घटनेनंतर तात्काळ सोशल मीडिया हँडल एक्सवर लिहिलय की, “मॅगडेबर्गची घटना सर्वात वाईट भिती निर्माण करते. माझ्या संवेदना पीडित आणि त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. आम्ही मॅगडेबर्गच्या जनतेसोबत आहोत. या कठीण प्रसंगात मदत आणि बचाव कार्यात गुंतलेल्या सर्वांचे मी आभार मानतो”

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -