लाडकी बहीण योजना. फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात प्रचंड गाजली. मुख्य म्हणजे महायुतीसाठी ही योजना गेमचेंजर ठरली. या योजनेमुळं लाडक्या बहिणींचं पाठबळ मिळालं असल्याचं महायुती सरकारच्या नेते मंडळींनी म्हटलंय.
विधानसभेत महायुतीला घवघवीत यश मिळालं. पण त्यानंतर लाडक्या बहिणींना सहाव्या हप्त्याची प्रतिक्षा करावी लागली. मात्र आता ही प्रतिक्षा संपली आहे. कारण लाडक्या बहिणींचा डिसेंबरचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महायुती सरकारच्या घवघवीत यशामध्ये लाडक्या बहिणींनी महत्त्वाची भूमिका बजावली. आतापर्यंत पाच हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहे. विधानसभेची निवडणूक होण्याआधी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता ओवाळणी म्हणून लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. मात्र डिसेंबर महिन्यातील सहावा हप्तेच्या प्रतिक्षेत महिलावर्ग होत्या. पण अखेर त्यांची प्रतिक्षा संपली आहे.
लाभार्थी लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरूवात झाली आहे. महिलांच्या खात्यात १५०० रूपये बँकेत जमा होण्यास सुरूवात झाली आहे. सरकारनं आपला शब्द पाळला. सरकारनं वर्षेअखेर लाडकी बहिणींना गोड भेट दिली आहे. ज्यामुळे महिलावर्गामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.
लाभार्थी महिलांच्या खात्यात १५०० रूपये जमा होण्यास सुरूवात झाली आहे. महायुतीनं लाडक्या बहिणींना २१०० रूपये देऊ असं आश्वासन दिलं होतं. लाडक्या बहिणींच्या खात्यात २१०० जमा करण्यात यावे अशी अपेक्षा महिला वर्गाने व्यक्त केली आहे. पण सध्या लाडक्या बहिणींना अनुदान मिळल्यानं आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.