Thursday, February 6, 2025
Homeमहाराष्ट्र2024 मध्ये सत्यात उतरले बाबा वेंगांचे ‘हे’ 3 भाकीत, आश्चर्यचकित करणारे खुलासे!

2024 मध्ये सत्यात उतरले बाबा वेंगांचे ‘हे’ 3 भाकीत, आश्चर्यचकित करणारे खुलासे!

नवीन वर्ष सुरू होताच सर्वांचं लक्ष असतं बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीवर. बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्यांवर संपूर्ण जगाची नजर आहे. नवीन वर्षात कोणत्या महत्त्वाच्या घटना (revelations)घडणार आहे.

 

बाबा वेंगा यांनी त्यांच्या भविष्यवणीद्वारे आधीच लोकांना सांगितलं आहे. 1966 मध्ये बाबा वेंगा यांचे निधन झाले, परंतु त्यांनी भविष्याबद्दल भाकीत (revelations)केले होते. ही भविष्यवाणी आजही खरी ठरत आहे. बाबा वेंगा यांनी 2024 सालासाठी अनेक भाकितं केली होती. यातील काही भाकिते खरी ठरली आहेत. याच भाकितांबद्दल आता जाणून घेऊया.

 

 

खरं तर 2024 हे वर्ष सुरू होताच अनेकांच्या नजर बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीवर होत्या. बाबा वेंगा यांनी केलेल्या अनेक भविष्यवाणी 2024 मध्ये खऱ्या ठरल्या आहेत. 2024 मधील भविष्यवणीनंतर आता लोकांच्या नजरा 2025 च्या भविष्यवाणीवर आहेत. 2024 प्रमाणे 2025 मध्ये कोणत्या भविष्यवाणी खऱ्या ठरणार यावर आता लोकांच्या नजरा आहे.

 

बाबा वेंगा यांनी 2024 सालासाठी केलेले भाकीत खरे ठरले असतानाच त्यांनी भविष्यातील जीवनाची आशाही दिली आहे. या भीतीदायक आणि आश्चर्यकारक भाकितांमध्ये जागतिक तापमानवाढीमुळे जगातील आर्थिक मंदीपासून ते हवामान संकटापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश होता आणि वैद्यकीय क्षेत्रात काही महत्त्वाची प्रगती पाहण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली होती. यापैकी 3 भाकिते खरी ठरली आहेत.

 

 

 

जागतिक आर्थिक मंदी

2024 मध्ये जागतिक आर्थिक मंदी येणार असल्याची घोषणा बाबा वेंगा यांनी केली होती. त्यांची ही भविष्यवाणी खरी ठरताना दिसली आणि जगात आर्थिक मंदी दिसू लागली आहे. जगातील परस्पर संघर्ष आणि आर्थिक शक्तींवरील वाढते कर्ज यामुळे वाढता राजकीय तणाव हे त्याचे कारण असल्याचे सांगण्यात आले. हा अंदाज यंदा जवळपास खरा ठरला आहे. कोणत्याही देशाने आर्थिक मंदी जाहीर केली नसली तरी चीनची अर्थव्यवस्था बरीच मंदावली आहे. वाढलेले व्याजदर, टाळेबंदी आणि उच्च चलनवाढ यांमुळे अमेरिकेत आधीच आर्थिक मंदी सुरू झाली आहे. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, ब्रिटनपासून ते जर्मनीपर्यंत सर्वच तज्ज्ञांनी सर्वत्र अर्थव्यवस्था मंदावल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे आर्थिक मंदिबाबत बाबा वेंग यांनी केलेलं भाकीत खरं ठरलं आहे.

 

हवामान संकट

हवामान संकटाबाबत बाबा वेंगा यांनी केलेलं भाकीतही खरे ठरत आहे. हिवाळा, उन्हाळा ते पावसाळा या सर्व ऋतूंनी जगभर धुमाकूळ घातला आहे. 2024 हे वर्ष आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष असणार आहे. भारतातच बघितले तर डिसेंबर अर्धा उलटून गेला तरी थंडीची चिन्हे नव्हती. डोंगरावर बर्फही दिसत नव्हता. कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसच्या उपसंचालक समंथा बर्गेस यांच्या मते, या वर्षीचे तापमान पूर्व-औद्योगिक पातळीपेक्षा 1.5 अंश सेल्सिअस जास्त असू शकते.

 

वैद्यकीय क्षेत्रात अनेक गंभीर आजार

2024 मध्ये वैद्यकीय क्षेत्रात अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता बाबा वेंगा यांनी व्यक्त केली होती. हा अंदाजही खरा ठरला आहे. इंटरलेस चाचणीत असे दिसून आले आहे की सर्विक्स कँसरवर सामान्य उपचार करण्यापूर्वी रुग्णांना केमोथेरपीचा एक छोटा कोर्स दिल्याने मृत्यूचा धोका 40 टक्क्यांनी कमी होतो. त्यामुळे कँसर पुन्हा उद्भवण्याचा धोकाही 35 टक्क्यांनी कमी झाला आहे. याशिवाय रशियाने कँसरवर लस बनवल्याचा दावाही केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -