Wednesday, January 1, 2025
Homeमहाराष्ट्र2027 सालापर्यंत इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राची भरभराट होणार, तब्बल 12 दशलक्ष नवे रोजगार निर्माण...

2027 सालापर्यंत इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राची भरभराट होणार, तब्बल 12 दशलक्ष नवे रोजगार निर्माण होण्याची शक्यता!

देशात सध्या वेगवेगळ्या क्षेत्रातील उद्योग, रोजगार वाढवण्यावर भर दिला जात आहे. गेल्या काही वर्षांपासून आयटी, इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे. आगामी काही वर्षात या क्षेत्राचा चेहरामोहरा बदललेला असणार आहे.

 

असे असतानाच आता 2027 सालापर्यंत इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रात 12 दशलक्ष नव्या नोकऱ्या निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.

 

प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे किती नव्या नोकऱ्या निर्माण होणार?

 

टीमलिज डिग्री अॅप्रेंडशीप या संस्थेच्या रिपोर्टनुसार 2027 सालापर्यंत इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात मोठी भरभराट होणार आहे. त्यामुळे या क्षेत्रातील नव्या नोकऱ्यांची संधीदेखील वाढणार आहे. 2027 सालापर्यंत 3 दशलक्ष प्रत्यक्ष तर 9 दशलक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. याच रिपोर्टनुसार प्रत्यक्ष नव्या नोकऱ्यांध्ये 1 दशलक्ष नोकऱ्या या अभियंत्यांना, 2 दशलक्ष नोकऱ्या या आयटीआय क्षेत्रातील ज्ञान असलेल्यांना तर 0.2 दशलक्ष नोकऱ्या या कृत्रिम बुद्धीमत्ता, मशिन लर्निंग, डेटा सायन्स आदी क्षेत्रात पारंगत असणाऱ्यांना नोकऱ्या मिळू शकतात.

 

इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र पाच पटीने वाढायला हवे

 

इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात आगामी वर्षात होणारी ही प्रगती लक्षात घेता त्याचा अर्थव्यवस्था वाढीलाही मोठा हातभार लागण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात भारत अधिकाधिक पुढे जावा यासाठी आगामी काळात प्रयत्न केले जाणार आहेत.2030 सालापर्यंत या क्षेत्राचे उत्पादन 500 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. हे लक्ष्य गाठायचे असेल तर पुढील पाच वर्षे या क्षेत्राची पाच पटीने वाढ झालेली असायला हवे. सध्या भारताचे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रआतील देशांतर्गत उत्पादन 101 अब्ज डॉलर्स आहे. यात मोबाईल फोन्सच्या उत्पादनाचा वाटा 43टक्के, कन्झ्यूमर आणि इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राचा वाटा 12 टक्के आणि इलेक्ट्रॉनिक्स घटकांच्या उत्पादानांचे योगदान 11 टक्के आहे.

 

भविष्यात इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राची भरभराट होणार

 

टीमलिज डिग्री अॅप्रेंडशीप या संस्थेच्या रिपोर्टनुसार भारतात सध्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात मोठी प्रगती होत आहे. ही प्रगती लक्षात घेता भारत लवकरच ग्लोबल इलेक्ट्रॉनिक हब म्हणून नावारुपाला येऊ शकतो. आर्थिक वर्ष 2023 चा विचार करायचा झाल्यास भारतातील एकूण व्यापार निर्यातीतील इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राचे योगदान हे सध्या 5.3 टक्के आहे. भविष्यात हे प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -