Tuesday, July 29, 2025
Homeमहाराष्ट्रनवीन वर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र सज्ज, ठिकठिकाणी जय्यत तयारी, पोलिसांची सर्वत्र करडी नजर

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र सज्ज, ठिकठिकाणी जय्यत तयारी, पोलिसांची सर्वत्र करडी नजर

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी महाराष्ट्र सज्ज झाला आहे. सध्या सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी विविध पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. २०२४ हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सध्या मुंबई, पुणे, नागपूर यांसह बहुतांश ठिकाणी नवीन वर्षाच्‍या स्‍वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे आज रात्री मुंबई लोकलकडून विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत. तर दुसरीकडे आज मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

 

कल्याणमध्ये आज पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे. या पार्श्वभूमीवर 2 सहाय्यक पोलीस आयुक्त, 83 अधिकारी, 532 अंमलदार तैनात असणार आहेत. त्यासोबत 17 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच 27 बीट मार्शल पेट्रोलिंग, 20 मोबाईल पेट्रोलिंग ही असणार आहे. तसेच प्रतिबंधक, छेडछाडविरोधी, बार चेकिंग, तपास आणि गोपनीय पथकं अशी विशेष पथके कार्यरत असणार आहेत. तसेच 8 ब्रेथ एनालायझर, 10 नाकाबंदी ठिकाणांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

 

पुण्यात सरत्या वर्षाला निरोपाच्या पार्टीवर नियंत्रण घालण्यासाठी 3000 पोलिस तैनात करण्यात आले आहेत. यामुळे दारू पिऊन गोंधळ घातल्यास कारवाई होणार आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबर रोजी पुणे पोलिसांनी चांगलीच खबरदारी घेतली आहे. त्या अनुषंगाने सर्वच पोलिस ठाण्यांतर्गत तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासोबतच पुणे शहरात ३ हजारांवर पोलिस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत. त्यासोबत ८०० वाहतूक पोलिस कर्मचारी चौका-चौकांमध्ये तैनात असणार आहेत. पुणे शहरात प्रामुख्याने २७ महत्त्वांच्या ठिकाणांवर ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई केली जाणार आहे.

 

नाशिकमध्ये नवीन वर्षाच्या नाशिककर सज्ज झाले आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिकचे पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. नाशिक शहरातील 65 स्पॉटवर ड्रिंक अँड ड्राईव्हची नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर तीन हजार पोलिसांचा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे. तसेच 200 पोलीस अधिकारी, 3000 पोलीस अंमलदार आणि सहाशे होमगार्डही रस्त्यावर असणार आहेत. यासोबतच गुंडाविरोधी पथक, अमली पदार्थ विरोधी, गुन्हे शोध पथक, बॉम्ब शोधक पथकही तैनात असणार आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी ,फिरस्ती पथक सीआर मोबाईल हे पोलिसांचे फिरस्ती पथकही सज्ज आहेत. अवघ्या चार मिनिटात ही पथक प्रतिसाद देणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -