काळजाचा थरकाप उडविणारी एक दुर्घटना समोर येत आहे, या घटना ऐकून तुमच्या देखील हृदयाचा ठाव घेतल्याशिवाय राहणार नाही. अवघे जग नववर्षाच्या स्वागतात असताना चार बहिणी आणि आईची (Murder)हत्या केल्याची घटना समोर आली.
लखनऊमधील हॉटेलमध्ये आई आणि 4 बहिणींची(Murder) हत्या करण्यात आली. या पाच जणांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी महिलेच्या मुलालाल अटक केली आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचे सांगितले जात आहे.
या आरोपीचे नाव अर्शद असे असून तो 24 वर्षांचा आहे. धारधार ब्लेडने अर्शगने पाचही जणींची हत्या केली आहे. अर्शदला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र यादरम्यान पोलिसांच्या हाती मोठी माहिती आली आहे. कुटुंबातील आणखी एक सदस्य अद्याप फरार आहे. हे दुसरे कोणी नसून अर्शदचे वडील आहेत. त्यांचाही या हत्येत सहभाग असण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशातील लखनौ शहर… नवीन वर्षात अशीच एक वेदनादायक आणि रक्तरंजित घटना घडली, त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे. लखनऊमधील एका हॉटेलमध्ये ५ जणांचे मृतदेह आढळून आले. या पाचही महिला एकाच कुटुंबातील होत्या. ही हत्या अन्य कोणी केली नसून त्याच्याच कुटुंबातील सदस्याने केली असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. हे कुटुंब दोन दिवसांपूर्वी आग्राहून लखनौला पोहोचले होते.
30 डिसेंबर रोजी कुटुंबीयांनी हॉटेल शरणजीतमध्ये एक खोली भाड्याने घेतली. सोमवारी सकाळी हॉटेल कर्मचाऱ्यांना खोलीत पाच मृतदेह विखुरलेले दिसले असता त्यांनी आरडाओरडा केला. याची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. त्यावेळी आरोपीही खोलीत उपस्थित होता. पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर आरोपीने हत्येची संपूर्ण कहाणी सांगण्यास सुरुवात केली.
अर्शद असे आरोपीचे नाव आहे. मृतांमध्ये अर्शदची आई अस्मा आणि चार बहिणी आलिया (वय 9 वर्षे), अलशिया (वय 19 वर्षे), अक्सा (वय 16 वर्षे) आणि रहमीन (वय 18 वर्षे) यांचा समावेश आहे. दरम्यान, अर्शदचे वडील सध्या घटनास्थळावरून फरार आहेत. त्याचाही या हत्येत सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस पथक अर्शदच्या वडिलांचा शोध घेण्यात व्यस्त आहे.
याप्रकरणी माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, अर्शदने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याची अधिक चौकशी करण्यात येत आहे. हॉटेल शरणजीतच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला हत्येची माहिती दिली होती. आरोपी अर्शदच्या वडिलांचाही शोध सुरू आहे. त्याचीही या हत्येत काही भूमिका असण्याची शक्यता आहे. अर्शदच्या वडिलांना अटक झाल्यावरच याची पुष्टी होईल. सध्या पोलिसांनी घटनास्थळावरून सर्व पुरावे गोळा केले आहेत. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. सर्वांच्या हातावर व मानेवर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत.
हे प्रकरण ठाणे नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अर्शद नावाच्या तरुणाने हॉटेल शरणजीतमध्ये आई आणि चार बहिणींची हत्या केली. कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी अर्शदला पोलिसांनी अटक केली आहे. प्राथमिक चौकशीत आरोपीने कौटुंबिक कलहातून हत्येचे कारण सांगितले. तरी सत्य काय आहे. याबाबत पोलीस अजूनही तपास करत आहेत.
डीसीपी रवीना त्यागी म्हणाल्या, ‘आज हॉटेल शरणजीतच्या एका खोलीत पाच जणांचे मृतदेह सापडले. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळ गाठून आग्रा येथील रहिवासी असलेल्या अर्शद नावाच्या व्यक्तीला अटक केली. प्राथमिक चौकशीतच त्याने खुनाची कबुली दिली. कौटुंबिक वादातून त्याने आपल्या चार बहिणी आणि आईची हत्या केल्याचे त्याने सांगितले. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली जात आहे. पुढील तपास सुरू आहे.