केंद्र सरकारने शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांना रब्बी पिकांचा विमा उतरवण्याच्या अंतिम तारखेत वाढ केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पिकांचा विमा उतरवून शेतकरी आपत्ती, पूर आणि दुष्काळामुळे त्यांच्या पिकांचे झालेले आर्थिक नुकसान भरून काढू शकतात.
रब्बी हंगामासाठी अधिसूचित केलेल्या पिकांमध्ये गहू-सिंचित, गहू-बिगरसिंचन, हरभरा, जवस, मसूर आणि मोहरी या पिकांचा समावेश केला आहे.
केंद्र सरकारने आता २०२४-२५ मधील अधिसूचित पिकांचा विमा उतरवण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर ते १० जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच शेतकरी अर्ज करण्यासाठी जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊ शकता. याशिवाय तुम्ही https://pmfby.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर जाऊन देखील अर्ज करू शकता. तुम्ही कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन क्रमांक १४४४७ वर देखील संपर्क साधू शकता.
आवश्यक कागदपत्रे :
आधार कार्ड
बँक पासबुकची फोटो कॉपी
जमिनीशी संबंधित कागदपत्रे