Sunday, February 23, 2025
Homeमहाराष्ट्रयेत्या दोन दिवसात राज्यात अवकाळी पावसाचे सावट, हवामान विभागाचा इशारा

येत्या दोन दिवसात राज्यात अवकाळी पावसाचे सावट, हवामान विभागाचा इशारा

गेल्या चार दिवसांपासून राज्यात सर्वत्र पुन्हा एकदा थंडीने जोर पकडला असून किमान तापमानात मोठी घसरण झाली आहे . येत्या दोन दिवसात राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार असून तापमानात आणखी ३ ते ४ अंशांनी घट होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पण त्यानंतर तापमानात २ ते ४ अंशांनी वाढ होणार असून विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात पावसाची दाट शक्यता असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

 

कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या २४ तासात तापमानात दोन ते चार अंशांची घट होणार असून किमान तापमान घसरणार आहे . विदर्भ वगळता उर्वरित राज्यात दोन दिवसानंतर तापमानात वाढ होणार असून हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे .विदर्भात पुढील पाचही दिवस हवामान कोरडे राहणार असून थंडीचा जोर कायम राहणार असल्याचा सांगण्यात आलंय . प्रादेशिक हवामान केंद्रानुसार १० व ११ जानेवारी रोजी हा पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -