Thursday, January 9, 2025
Homeमहाराष्ट्ररेशन कार्ड बंद झालं तर पुन्हा ॲक्टिव्ह कसं करायचं?

रेशन कार्ड बंद झालं तर पुन्हा ॲक्टिव्ह कसं करायचं?

रेशन कार्ड आजच्या घडीला एक महत्त्वाचं कागदपत्र आहे. तुम्ही जर त्यावर धान्य घेत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही धान्य घेत नसाल आणि तुम्हाला बंद झालेलं रेशन कार्ड पुन्हा सुरू करायचं तरी देखील तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.

 

जर तुम्ही रेशन कार्डवर मिळणाऱ्या स्वस्त धान्याचा लाभ घेत नसाल, तर तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं. सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या (PDS) नियमानुसार, किमान सहा महिने रेशन कार्डवर धान्य न घेतल्यास कार्ड रद्द केले जाऊ शकते. मात्र, जर तुमचं कार्ड रद्द झालं असेल, तरी ते पुन्हा अ‍ॅक्टिव्ह कसं करायचं हे आज जाणून घेणार आहोत.

रेशन कार्ड रद्द होण्याचे कारण

 

 

रेशन कार्डचा उद्देश गरजू कुटुंबांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देणे आहे. मात्र, अनेक जण हे धान्य घेत नसल्याचं समोर आलं आहे. सहा महिने किंवा त्याहून अधिक काळ रेशन न घेतल्यास, संबंधित व्यक्तीला या सुविधेची गरज नाही, असे मानले जाते आणि अशा परिस्थितीत रेशन कार्ड रद्द केले जाते.

रेशन कार्ड पुन्हा अ‍ॅक्टिव्ह कसे कराल?

 

 

 

रेशन कार्ड अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील:

 

राज्याच्या अधिकृत AePDS पोर्टलवर लॉगिन करा

 

तुमच्या राज्याच्या किंवा सेंट्रल AePDS पोर्टलला भेट द्या.

 

रेशन कार्ड करेक्शन पर्याय निवडा

 

पोर्टलवर “Ration Card Correction” पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा.

 

रेशन कार्ड डिटेल भरा

 

रेशन कार्ड नंबर आणि संबंधित तपशील भरून सबमिट करा.

 

चुका दुरुस्त करा

 

जर कार्डमध्ये काही चुकीची माहिती असेल, तर ती पोर्टलवरून दुरुस्त करा.

 

PDS कार्यालयात अर्ज सबमिट करा

 

अर्ज पूर्ण केल्यानंतर तो सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) कार्यालयात सबमिट करा.

 

अर्ज मंजूर झाल्यावर कार्ड अ‍ॅक्टिव्ह होईल

 

अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रद्द झालेलं कार्ड पुन्हा सक्रीय केले जाईल.

 

 

रेशन कार्ड रद्द होण्यापासून वाचण्यासाठी नियमितपणे रेशनवर मिळणाऱ्या सुविधा घ्या. पोर्टलवरील तपशील नेहमी अपडेट ठेवा. गरज नसल्यास कार्ड रद्द करण्यासाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधा. रेशन कार्ड पुन्हा अ‍ॅक्टिव्ह करणे ही सोपी प्रक्रिया आहे, मात्र वेळेत योग्य पावले उचलणे गरजेचे आहे. जर तुमचं रेशन कार्ड जुनं असेल किंवा KYC अपडेट नसेल तरीसुद्धा ते रद्द होऊ शकतं. त्यामुळे तुमच्या जवळच्या केंद्रावर जाऊन ते नविसरता अपडेट करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -