Saturday, January 11, 2025
Homeमहाराष्ट्रट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याच जिनपिंग यांना निमंत्रण, पीएम मोदींना नाही, असं का?

ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याच जिनपिंग यांना निमंत्रण, पीएम मोदींना नाही, असं का?

येत्या 20 जानेवारीला डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. आपल्या शपथग्रहण सोहळ्यात सहभागी होण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक जागतिक नेत्यांना निमंत्रण पाठवलं आहे. यात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंगही आहेत. या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव नाहीय. यामुळे राजकीय आणि कूटनितीत वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहेत. मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत आमने-सामने होत्या. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्र महासभेत सहभागी होण्यासाठी न्यू यॉर्कला गेले होते. त्यावेळी एका पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती.

 

ट्रम्प यांचं असं मत होतं की, पंतप्रधान मोदींसोबत हाय-प्रोफाइल भेट झाल्यास त्यांची निवडणुकीतील प्रतिमा आणखी मजबूत होईल. अर्जेंटीनाचे राष्ट्रपती जेवियर मिले, हंगेरीचे पंतप्रधान विक्टर ऑर्बन आणि इटलीच्या पंतप्रधान जियोर्जिया मेलोनी सारखे जागतिक नेते डोनाल्ड ट्रम्प यांचं समर्थन करत होते. ट्रम्प यांना काहीजण भेटले. डोनाल्ड ट्रम्प यांची पंतप्रधान मोदींसोबत एक बैठक झाली असती, तर ट्रम्प समर्थक आणि अमेरिकन जनतेमध्ये एक मोठा संदेश गेला असता.

 

ट्रम्पना भेटायचं होतं, पण भारताने काय विचार केला?

डोनाल्ड ट्रम्प यांनी, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली, त्यावेळी भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांसमोर एक कठीण प्रश्न निर्माण झाला. 2019 मध्ये ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी एकत्र आले होते. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांचा अप्रत्यक्षपणे प्रचार झाल्याचा आरोप झालेला. याकडे कुटनितीक चूक म्हणून पाहिलं गेलं होतं. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ठरवलं की, अमेरिकन राष्ट्रपतीपदांच्या उमेदवारापासून अंतर ठेवणं भारताच्या दीर्घकालीन हिताच ठरेल.

 

म्हणून भेट घेतली नाही

 

कारण मोदी ट्रम्प यांना भेटले असते आणि कमला हॅरिस यांनी निवडणूक जिंकली असती, तर भारत-अमेरिका संबंधांवर नकारात्मक परिणाम झाला असता. याच कारणामुळे पंतप्रधान मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली नाही.

 

शी जिनपिंग अमेरिकेला जाणार का?

 

मोदी यांच्यासोबत भेट झाली असती, तर निवडणुकीत फायदा झाला असता असं ट्रम्प यांचं मत होतं. पण ट्रम्प यामुळे नाराज झाले. आता डोनाल्ड ट्रम्प निवडणूक जिंकले असून ते पुन्हा राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहेत. ट्रम्प यांनी शपथग्रहण सोहळ्यासाठी विशेषकरुन त्या नेत्यांना बोलावलय जे वैचारिक दृष्ट्या त्यांच्या जवळचे आहेत. ज्यांनी जाहीरपणे त्यांचं समर्थन केलं. चीनसोबत बिघडलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना विशेष निमंत्रण पाठवलय. जिनपिंग स्वत: उपस्थित राहणार नाहीयत. त्यांनी त्यांच्या वरिष्ठ प्रतिनिधीला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

 

भारताचा पुढचा मार्ग काय?

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथग्रहण सोहळ्यात सहभागी झाले नाही, म्हणून काही दीर्घकालिन प्रभाव पडणार नाही. भारत-अमेरिका संबंध मजबूतच राहतील. मग, व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प असो किंवा अन्य कोणी. या घटनेतून एक गोष्ट लक्षात येते की, भारत आपल्या परराष्ट्र धोरणाकडे जागतिक आणि दीर्घकालिन दृष्टीकोनातून बघतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -