Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्र'टक्कल व्हायरस'चा सगळ्यात खतरनाक Video, 10 सेकंदात महिलेचे सगळे केस गळाले

‘टक्कल व्हायरस’चा सगळ्यात खतरनाक Video, 10 सेकंदात महिलेचे सगळे केस गळाले

बुलढाण्यातील केसगळती प्रकरणाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ शेगाव तालुक्यातील असल्याची माहिती मिळत आहे. या व्हिडिओत महिलेच्या डोक्यावरील सगळे केस एकाच वेळी निघून टक्कल पडत असल्याचं दिसून येतंय.

 

अगदी सहजपणे हे केस हातात येत असून एकाचवेळी सगळेच्या सगळे केस निघालेत. न्यूज 18 लोकमतच्या हाती हा व्हिडिओ लागला असून त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. समोर आलेल्या या व्हिडिओनं आरोग्य यंत्रणेचीही झोप उडाली आहे.

 

बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीचं नेमकं कारण शोधण्यासाठी आयसीएमआरचे चार पथकं बाधित गावात दाखल झाली आहेत. दिल्ली, चेन्नई, भोपाळ आणि पुण्याच्या आयसीएमआरच्या टीम्स बोंडगावात दाखल झाल्या असून गावातील रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. या टीम कडून रुग्णांच्या केसांची, रक्ताची, त्वचेची त्याचबरोबर अन्नधान्याची देखील तपासणी केली जाणार आहे.

टक्कल व्हायरसने जिल्ह्यात पसरले हात-पाय

 

 

तर दुसरीकडे या टक्कल व्हायरसने जिल्ह्याभरात हातपाय पसरण्यास सुरुवात केल्याचं दिसून येतंय. शेगावसोबतच नांदुरा तालुक्यातही या व्हायरसनं शिरकाव केला असून नांदुरा तालुक्यातील वाडी गावात टक्कल पडलेले 7 रुग्ण आढळून आलेत, त्यामुळे आता टक्कल व्हायरसचा शिरकाव जिल्हाभर होणार का? अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

 

बुलढाण्यामधील या टक्कल व्हायरसने आतापर्यंत तब्बल 139 जणांना टक्कल पडलं आहे. अकोला आणि बुलढाण्यातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या वेगवेगळ्या आजाराच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांच्या नखाचे, त्वचेचे, रक्ताचे, पाण्याचे आणि मातीचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले, यातल्या पाणी तपासणीच्या अहवालात पाण्यात नायट्रेटचं प्रमाण अधिक असल्याचं स्पष्ट झालं.

फंगल इन्फेक्शन नाही

 

 

पाण्यातील नायट्रेटचं प्रमाण 10 टक्के असायला पाहिजे, ते प्रमाण प्रती लीटर 54 टक्के म्हणजेच 5 पट अधिक असल्याचं समोर आलं. तसंच क्षाराचे प्रमाण 2100 आहे ते केवळ 110 असायला पाहिजे. सुरूवातीला फंगल इन्फेक्शन असल्यामुळे नागरिकांना टक्कल पडत आहे, असा अंदाज बांधण्यात आला होता, मात्र बायोप्सी टेस्टिंग अहवालानंतर हे फंगल इन्फेक्शन नसल्याचं समोर आला आहे, त्यामुळे आता टक्कल नेमकं कशामुळे पडतंय? याचं गूढ कायम आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -