अल्पवयीन मुलीला प्रेमाची फूस लावून तिच्याशी शरीरसंबंध ठेवत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गावभाग पोलिसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इस्माईल इब्राहीम गडेकर (वय २३) असे त्याचे नांव असून या प्रकरणी पिडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.
पिडीत मुलगी व संशयित गडेकर हे एकाच परिसरात राहण्यास आहेत. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही संशयिताने तिला फूस लावत तिच्याशी शरीरसंबंध ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी गडेकर याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.