भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळांडूचे वैयक्तिक आयुष्य गेल्या काही महिन्यांपासून ठीक नाहीये. गेल्या वर्षी हार्दिक पंड्याने घटस्फोटाती घोषणा केली. टी-20 वर्ल्डकप जिंकून आल्यानंतर हार्दिक व त्याची पत्नी नताशआ यांनी वेगळं होत असल्याची अधिकृत घोषणा केल्याने सर्वांनाच धक्का बसला. तर गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघातील क्रिकेटपटून युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या नात्याबद्दलही उलटसुलट चर्चा ऐकायला येत आहे. हे कमी की काय म्हणून आता भारताच्या एका दिग्गज, माजी खेळाडूच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही वेगवेगळे दावे, चर्चा ऐकायला मिळत आहेत. वीरेंद्र सहवाग याच्या वैयक्तिक आयुष्यात सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. एका रिपोर्टनुसार, सहवाग आणि त्याची पत्नी आरती यांचा 21 वर्षांचा संसार मोडण्याच्या उंबरठ्यावर आहे, ते दोघेही एकत्र नव्हे तर वेगवेगळे रहात आहेत, असाही दावा करण्यात येत आहे.
दोघांमध्ये वाढला दुरावा
भारताचा (माजी) स्फोटक फलंदाज असलेला वीरेंद्र सेहवाग आणि आरतीचे 2004 साली झाले होते. पण आता तब्बल 21 वर्षानंतर त्यांचे नाते तुटताना दिसत आहे. दोघांनीही इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकमेकांना अनफॉलो केले आहे. एवढंच नव्हे तर सेहवागच्या अलीकडच्या पोस्ट्स आणि अपडेट्समध्येही पत्नीसोबतचा एकही फौटो नाहीये. दिवाळीच्या काळातही त्याने फक्त त्याची मुलं आणि आईसोबतचे फोटो पोस्ट केले होते, त्या फोटोंध्ये त्याची पत्नी कुठेच दिसली नाही.
एका रिपोर्टमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, वीरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरती काही काळापासून वेगळे राहत आहेत आणि लवकरच त्यांचा घटस्फोट होणार आहे. सेहवाग आणि आरती यांना आर्यवीर आणि वेदांत अशी दोन मुले आहेत. त्यांची दोन्ही मुलेही क्रिकेटमध्ये सक्रिय आहेत. सेहवाग किंवा त्याच्या पत्नीबद्दल इतक्या वर्षात कोणतीही चर्चा नव्हती , दोघेही बऱ्याचदा एकत्र दिसायचे. पण गेल्या काही काळापासून दोघांच्या नात्यात तणाव निर्माण झाला असून त्यामुळेच त्यांचा मार्ग वेगळा होताना दिसतोय असा दावाही रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
कुटुंब नव्हतं तयार, मग असं झालं लग्न
वीरेंद्र सेहवागने 1999 मध्ये टीम इंडियासाठी खेळत आंतरराष्ट्रीय करिअरची सुरुवात केली. त्याने एप्रिल 2004 मध्ये आरती अहलावतसोबत लग्न केले. दोघांचा हा प्रेमविवाह होता, पण त्यासाठी कुटुंबात एकमत नव्हते. त्यामागचं कारण म्हणजे त्या दोघांच्या कुटुंबात दूरचं नातं होते. पण एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या सेहवाग आणि आरतीने कशीबशी कुटुबियांची समजूत काढत त्यांना लग्नासाठी मनवलं.त्यानंतर तत्कालीन केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निवासस्थानी दोघांनीही मोठ्या थाटामाटात लग्न केले. या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली होती. सहवागने मुलतानमध्ये पाकिस्तानविरुद्ध त्रिशतक झळकावल्यानंतर महिनाभरातच त्याचे आरतीशी लग्न झाले, त्यामुळे हे लग्न बरचं चर्चेत होतं.