Friday, February 14, 2025
Homeराजकीय घडामोडीजरांगेंची प्रकृती खालावली; बोलताही येईना, धनंजय देशमुखांकडून सरकारला अल्टिमेटम, म्हणाले उद्याच्या उद्या.

जरांगेंची प्रकृती खालावली; बोलताही येईना, धनंजय देशमुखांकडून सरकारला अल्टिमेटम, म्हणाले उद्याच्या उद्या.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी शनिवारी २५ जानेवारी २०२५ पासून पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसलं आहे. मनोज जरांगे हे सातव्यांदा उपोषणासाठी बसले आहेत.

 

त्यांनी आंतरवाली सराटीत उपोषण सुरु केले आहे. सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, ‘सगे सोयरे’ अंमलबजावणी तातडीने करा, शिंदे समितीला तातडीने मुदतवाढ द्या, कक्ष सुरू करा, वंशावळ समिती गठीत करा, शिंदे समिती मनुष्यबळ वाढवा, संख्याबळ द्या,नोंदी सापडलेल्या लोकांना प्रमाणपत्र द्या, अशा मागण्या त्यांनी सरकारपुढे ठेवल्या आहेत. त्यातच आता बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणात सहभागी होणार आहेत.

 

धनंजय देशमुख हे नुकतंच आंतरवाली सराटी गावात दाखल झाले आहेत. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीनंतर धनंजय देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. “मनोज जरांगेंची प्रकृती खूप खालावत आहे. त्यांना बळ द्यावा. सरकारने लवकरात लवकर त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मी विनंती करतो. सरकारने गांभीर्यपूर्वक याची दखल घेतली पाहिजे. उद्याच्या उद्या शिष्टमंडळाने येऊन या ठिकाणी भेट दिली पाहिजे. त्यांच्या मागण्या योग्य आहेत. त्यामुळे सरकारने त्या मान्य कराव्यात”, असे धनंजय देशमुख म्हणाले.

 

मस्साजोगचे ग्रामस्थही आंतरवाली सराटीत दाखल

 

धनंजय देशमुख हे उद्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणात सहभागी होणार आहेत. ते देखील मनोज जरांगेंसोबत उपोषणासाठी बसणार आहेत. धनंजय देशमुखांसोबत मस्साजोगचे ग्रामस्थही आंतरवाली सराटीत दाखल झाले आहेत. धनंजय देशमुख दाखल होताच मनोज जरांगे पाटील हे उठून बसले. मात्र त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना बोलता येत नाही.

 

जरांगे पाटील यांचे कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन

 

दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी काही तासांपूर्वी सर्व कार्यकर्त्यांना भावानिक आवाहन केले आहे. उपोषणाला बसणाऱ्यांनी उपोषण सोडावे. सर्वांनी या ठिकाणी बसून मला साथ द्या. उपोषणामुळे शरीराची चाळणी होते. माझे शरीर खराब झाले, तुमचे होऊ देऊ नका, असे भावनिक आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले. तर दुसरीकडे कार्यकर्त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना आवाहन केले आहे. जोपर्यंत जरांगे पाटील उपोषण सोडत नाहीत तो पर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे जरांगेंसोबत उपोषणासाठी बसलेले उपोषणकर्ते हे उपोषणावर ठाम आहे. त्यांनी उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा पावित्रा घेतला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -