Thursday, March 13, 2025
Homeमहाराष्ट्रकेंद्र सरकारचे नवे निर्देश!! रेशन कार्डसाठी ई-केवायसी अनिवार्य

केंद्र सरकारचे नवे निर्देश!! रेशन कार्डसाठी ई-केवायसी अनिवार्य

केंद्र सरकारने (Central Government) सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. या योजनेतून नागरिकांना आर्थिक मदत आणि सोयीसुविधा सरकारने पुरवल्या जात आहेत. या योजनांपैकीच अत्यंत महत्त्वाची योजना म्हणजे रेशन कार्ड योजना (Ration Card Yojana). नागरिकांना कमी दरात जीवनावश्यक वस्तू, धान्य पुरविणाऱ्या या योजनेचा कोट्यवधी लोक फायदा घेत आहेत. याचं योजनेसंदर्भात एक बातमी समोर आली आहे.

 

राज्य सरकारने रेशन कार्डबाबत काही नवे नियम लागू केले आहेत. या नियमात शिधापत्रिकाधारकांसाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. ई-केवायसी न केल्यास लाभार्थ्यांना रेशन मिळणार नाही, असे स्पष्ट सांगण्यात आले आहे. ई-केवायसीमुळे बनावट शिधापत्रिकांची संख्या कमी होईल आणि केवळ पात्र नागरिकांनाच रेशनचा लाभ मिळेल, यामुळे सरकारने हा नियम लागू केला आहे.

 

नागरिक ई-केवायसीसाठी आपल्या जवळच्या अन्न पुरवठा केंद्रावर जाऊ शकतात किंवा ऑनलाइन प्रक्रियेच्या माध्यमातूनही ही सेवा पूर्ण करू शकतात. परंतु असे नाही केल्यास नागरिकांना मोठा फटका बसू शकतो.

 

ई-केवायसी म्हणजे नेमकं काय?

ई-केवायसी म्हणजे नागरिकांची वैयक्तिक व शिधापत्रिकेशी संबंधित माहिती डबल चेक करण्याची प्रक्रिया होय. या प्रक्रियेद्वारे आधार कार्ड, मोबाईल नंबर, पत्त्याचे प्रमाणपत्र आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे तपासली जातात. यामुळे चुकीची कागदपत्रे आणि माहिती लगेच समोर येते. आता रेशन कार्ड ई-केवायसी केल्यामुळे बनावट शिधापत्रिकांची संख्या रोखता येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -