Friday, February 21, 2025
HomeBlogBSNL चा 99 रुपयांचा रिचार्ज; स्वस्तात मिळतात हे फायदे

BSNL चा 99 रुपयांचा रिचार्ज; स्वस्तात मिळतात हे फायदे

BSNL चा 99 रुपयांचा रिचार्ज; स्वस्तात मिळतात हे फायदे

टेलिकॉम नियामक प्राधिकरण (TRAI) ने नुकतेच सर्व टेलिकॉम कंपन्यांना स्वस्त व्हॉइस कॉल आणि एसएमएस प्लॅन्स लाँच करण्यासंदर्भात निर्देश दिले होते. यामुळे अनेक युजर्स, जे केवळ व्हॉइस कॉल आणि एसएमएसचा वापर करत आहेत, त्यांना डेटा प्लॅन न घेता त्यांच्या गरजा भागविण्यासाठी स्वस्त पर्याय उपलब्ध होईल. त्यानंतर जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन यांसारख्या कंपन्यांनी अशा प्रकारचे प्लॅन्स लाँच केले होते आणि आता BSNL ने देखील त्याचे प्लॅन्स बाजारात आणले आहेत. तर चला या BSNL च्या प्लॅनबदल अधिक माहिती जाणून घेऊयात.

BSNL ने 99 रुपयांचा प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे ज्यामध्ये युजर्सना 17 दिवसांच्या व्हॅलिडिटीमध्ये अमर्यादित कॉलिंगची सुविधा मिळते. हा प्लॅन एक व्हॉइस कॉलिंग व्हाउचर आहे, जो संपूर्ण देशभरात, मुंबई आणि दिल्लीसह, वापरता येईल. त्यामुळे ग्राहकांना याचा मोठयाप्रमाणात फायदा होईल.

BSNL चा 439 रुपयांचा प्लॅन देखील युजर्ससाठी एक आकर्षक ऑफर आहे. या प्लॅनमध्ये 90 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि 300 एसएमएसची सुविधा आहे. हे फायदे जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया यांसारख्या इतर कंपन्यांमध्येदेखील उपलब्ध आहेत.

BSNL (BSNL Recharge Plans) ने भारतभरातील 60,000 4G साइट्स सुरू केल्या आहेत आणि कंपनीने 4G नेटवर्कच्या विस्तारासाठी मेड-इन-इंडिया टेक्नोलॉजीचा वापर केला आहे. तसेच , BSNL ने VoLTE सेवा संपूर्ण देशात सुरू केली नसली तरी, 4G नेटवर्कचा विस्तार अत्यंत झपाट्याने करण्यात आला आहे. यामुळे, BSNL च्या नवीन प्लॅन्स आणि 4G विस्तारामुळे युजर्सना अधिक स्वस्त आणि कार्यक्षम सेवा मिळण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -