Wednesday, March 12, 2025
HomeBlogकोल्हापुरात पोलीस अधिकाऱ्याला मारहाण

कोल्हापुरात पोलीस अधिकाऱ्याला मारहाण

कोल्हापुरात पोलीस अधिकाऱ्यालाच मारण झाल्याची घटना नुकताच घडली. मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीचे काम आटोपून मध्यवर्ती बसस्थानकात उतरल्यानंतर शाहूपुरी पोलिस ठाण्याकडे निघालेले सहायक पोलिस निरीक्षक विशाल दशरथ मुळे यांना खासगी ट्रॅव्हल्सच्या एजंटस्नी बेदम मारहाण केली.

मारहाणीचा हा प्रकार मंगळवारी (दि. 28) रात्री साडेअकराच्या सुमारास महालक्ष्मी चेंबरसमोर घडला.
मुळे यांच्या फिर्यादीनुसार शाहूपुरी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला असून, यातील दिलदार मुजावर आणि अकिब पठाण या दोघांना पोलिसांनी अटक केली. याबाबत शाहूपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विशाल मुळे हे मुंबई येथे उच्च न्यायालयातील कामासाठी गेले होते. मंगळवारी रात्री ते एस. टी. ने कोल्हापुरात आले. हातात बॅग घेऊन चालत शाहूपुरी पोलिस ठाण्याकडे ते निघाले होते.

यावेळी महालक्ष्मी चेंबरसमोरील खासगी ट्रॅव्हल्स एजंट अकिब पठाणला मुळे हे परगावी चालले असावेत, असा समज झाला. पठाण हा मुळे यांना पुण्याला जाणारी ट्रॅव्हल्स लागली आहे, असे सांगून हाताला धरून ओढू लागला. यातून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिक जमा झाले.

पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांना देत होते. साध्या वेषात असल्याने विशाल मुळे हे पोलिस असल्याचे कोणालाच माहीत नव्हते. मुळे आणि डोके यांच्यात फोनवर चर्चा सुरू असतानाच अन्य तिघांनी त्यांना मारहाण करायला सुरुवात केली.

या घटनेमुळे परिसरात वातावरण तणावपूर्ण बनले. दरम्यान, विशाल मुळे यांनी तत्काळ शाहूपुरी पोलिस ठाण्यात जाऊन संबंधितांविरोधात तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी अकिब पठाण, दिलदार मुजावर व जावेद मुजावर यांच्यावर गुन्हा दाखल केला. यापैकी दिलदार मुजावर व अकिब पठाण यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली.

दरम्यान तिकिटाचे पैसे मागितले म्हणून
विशाल मुळे हे मुंबईला जाताना ट्रॅव्हल्समधून फुकट गेले. परत आल्यानंतर तिकिटाचे पैसे मागितले म्हणून त्यांना मारहाण केली. ते मद्यधुंद अवस्थेत होते. याबाबत दिलदार मुजावर व जावेद मुजावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता, मुळे यांनीच या दोघांना मारहाण केली असा आरो प कोल्हापूर जिल्हा बस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष सतीश चंद्र कांबळे यांनी केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -