बजेट 2025 सादर झाल्यानंतर मध्यमवर्ग आनंदून गेला आहे. 12 लाखांची कमाई करमु्क्त झाल्याचे निर्मला सीतारमण यांनी जाहीर केले. त्यामुळे मध्यमवर्गाच्या खिशावरील ताण कमी होईल. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) सुद्धा या वर्गाला गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे.
पतधोरण समितीची (MPC) बैठक 5 फेब्रुवारी रोजी सुरु होत आहे. त्यामध्ये सुध्दा मध्यमवर्गाला मोठे गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. 5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान ही बैठक होत आहे. त्यात रेपो दरात कपात होण्याचे संकेत मिळत आहेत.
गेल्या 10 वेळा रेपो दरात कोणताही बदल झालेला नाही. आता रेपो दर 6.5 टक्के इतका आहे. रेपो दरात कपातीची मागणी जोर धरत आहे. महागाईमुळे रेपो दरावर अनेकदा पाणी फेरले गेले आहे.
जर रेपो दरात कपात झाली तर ग्राहकांना स्वस्त दरात गृहकर्ज, वाहन कर्ज घेता येईल. त्यांच्या खिशावरील व्याजाचा बोजा कमी होईल. त्यांच्या हाती शिल्लक पैसा उरल्यास त्यांची क्रयशक्ती नक्कीच वाढले. हा पैसा पुन्हा बाजारात येईल.
EMI चे ओझे कमी झाल्याने ग्राहक खरेदीसाठी पुन्हा पुन्हा बाजारात येतील. सध्या महागाई, विविध कराचे ओझे, नि वाढलेल्या व्याजदराने ग्राहकाचे हात बांधले गेलेले आहे. त्याची बचत होत नसल्याने तो बाजारातही खरेदी करत नसल्याचे चित्र आहे.