ताजी बातमी ऑनलाईन टीम
ऑस्ट्रेलियातून कोल्हापुरात आलेल्या १० वर्षीय मुलाल कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, संबंधित मुलाचे नमुने तपासणीसाठी पुण्यात पाठवण्यात आले आहेत.
दरम्यान, ओमायक्रॉनची धास्ती पाहता शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोल्हापूर मनपा प्रशासनाने तातडीने संबंधित मुलाचे नमुने पुण्याला तपासण्यासाठी पाठवले आहेत. मात्र, या प्रकाराने मनपा प्रशासनात खळबळ उडाली आहे.
संबंधित मुलगा आपल्या कुटुंबियांसमवेत ऑस्ट्रेलियाला गेला होता. हे संबंधित कुटुंब रमणमळा परिसरातील असून काही दिवसांपूर्वी ते कुटुंबीय कोल्हापुरात परतले.
तत्पूर्वी, विमानतळावर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात संबंधित कुटुंबीयांचा अहवाल निगेटिव्ह आला. परदेशातून कोल्हापुरात आल्याने ११ डिसेंबरला त्या कुटुंबाची rt-pcr तपासणी करण्यात आली. या तपासणीत त्या कुटुंबातील दहा वर्षाचा मुलाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला
ब्रेकिंग….ऑस्ट्रेलियातून कोल्हापुरात आलेल्या १० वर्षीय मुलाला कोरोनाची लागण
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -