ताजी बातमी ऑनलाईन टीम
मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडनं (Ruturaj Gaikwad) विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hajare Trophy) सलग तीन शतक केली आहेत. केरळ विरोधात 124, छत्तीसगड विरोधात 154 आणि मध्य प्रदेश विरोधात 136 धावांचीं खेळी केली आहे. ऋतुराज गायकवाडच्या खेळीवर माजी क्रिकेटपटू आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांनी ऋतुराजला दक्षिण आफ्रिकेविरोधातील एक दिवसीय मालिकेत संधी देण्याची हीच योग्य वेळ असल्याचं म्हटलं आहे. दिलीप वेगंसरकर यांनी विजय हजारे ट्रॉफीतील ऋतुराज गायकवाडचा भन्नाट फॉर्म, आयपीएलमधील टॉप रन स्कोअरर या गोष्टींमुळे त्याला आता टीम इंडियाच्या वनडे संघात संधी मिळायला हवी, असं म्हटलं आहे. महाराष्ट्राकडून खेळणाऱ्या ऋतुराजची निवड आता थेट दक्षिण आफ्रिके विरोधातील वनडे टीममध्ये व्हावी, अशी इच्छा दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केली आहे.
विजय हजारे ट्रॉफीत ऋतुराज गायकवाड सध्या भन्नाट फॉर्ममध्ये आहे. त्यानं केरळ विरोधात 124, छत्तीसगड विरोधात 154 आणि मध्य प्रदेश विरोधात 136 धावांचीं खेळी केली आहे. तर, आयपीएलमध्ये ऋतुराज गायकवाडनं 16 मॅचमध्ये 45.35 च्या सरासरीनं 635 धावा केल्या होत्या. सीएसकेला आयपीएलचं विजेतेपद मिळवून देण्यात ऋतुराजचं महत्त्वाचं योगदान होतं.
शिखर धवनच्या नेतृत्त्वात टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेली होती. त्या टीममध्ये ऋतुराजला संधी देण्यात आली होती. त्यावेळी त्यानं दोन टी-20 सामन्यांमध्ये 35 धावा केल्या होत्या. टीम इंडियाकडे सध्या के.एल.राहुल आणि रोहित शर्मा हे दोन ओपनर आहेत. त्यामुळं ऋतुराज गायकवाड तिसऱ्या स्थानावर देखील बॅटिंग करु शकतो. ऋतुराज गायकवाडला सध्या संधी देणं गरजेचं आहे, असं दिलीप वेंगसरकर म्हणाले. ऋतुराजचं सध्याचं वय 24 आहे त्यामुळं त्याला आता संधी देण्याची गरज आहे. तो 28 वर्षांचा झाल्यानंतर त्याला संधी देऊन उपयोग नाही, असं देखील वेंगसरकर म्हणाले. ऋतुराज गायकवाड 10 वर्षांचा असताना त्याची खेळी पाहून वेंगसरकर प्रभावित झाले होते.
ऋतुराज गायकवाडची विजय हजारे ट्रॉफीत सलग तीन वादळी शतकं, दिलीप वेगंसरकर म्हणतात ‘हीच ती वेळ’
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -