Tuesday, February 4, 2025
Homeमहाराष्ट्रपहिल्यांदाच घडलंय ! त्या बाळाच्या पोटात एक नव्हे दोन अर्भकं, ऑपरेशन यशस्वी

पहिल्यांदाच घडलंय ! त्या बाळाच्या पोटात एक नव्हे दोन अर्भकं, ऑपरेशन यशस्वी

बुलढाण्यात एक विचित्र घटना घडली होती. एका महिलेच्या पोटात असलेल्या बाळाच्या पोटात अर्भक असल्याचं आढळून आलं होतं. आज या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या बाळाच्या पोटात एक अर्भक असल्याचं डॉक्टरांनाही वाटलं होतं. पण ऑपरेशन करताना या बाळाच्या पोटात एक नव्हे तर चक्क दोन अर्भकं निघाली. डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून ही दोन्ही अर्भके काढली आहेत. मात्र, पहिल्यांदाच असा प्रकार घडल्याने डॉक्टरही हैराण झाले आहेत. ही महिला आणि बाळ दोन्ही सुखरूप असल्याचं सांगण्यात आलं आहे.

 

बुलढाण्यातील तीन दिवसाच्या नवजात बाळावर आज अमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या बाळाच्या पोटात एक नव्हे तर दोन अर्भकं निघाली. ही दोन्ही अर्भके तीन इंचाची होती. विशेष म्हणजे या बाळाच्या पोटातील दोन्ही अर्भकांनी मानवी आकार घेतला होता. शरीर तयार झाली होती. मात्र, 5 डॉक्टर, 4 नर्स आणि इतर कर्मचारी अशा 12 जणांचा स्टाफ ऑपरेशनच्या तयारीला लागला होता. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नामुळे या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया करून दोन्ही अर्भके काढण्यात आली आहेत.

 

डॉक्टरांसाठी आव्हान

पुरुष जातीच्या नवजात बालकाच्या पोटातून दोन अर्भके निघण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. या बाळाचं यशस्वी ऑपरेशन करणं हे डॉक्टरांसाठीही आव्हानच होतं. पण डॉक्टरांनी हे आव्हान पेललं आणि नवजात अर्भकांचं यशस्वी ऑपरेशन केलं. डॉ. उषा गजभिये यांच्या नेतृत्वात हे ऑपरेशन यशस्वी झाले. या ऑपरेशननंतर बाळाच्या आईवडिलांनी डॉक्टरांचे आभार मानले.

 

पाच लाखात एखादी घटना

 

बुलढाण्यातील एका नऊ महिन्याच्या गर्भवती महिलेच्या पोटात आणखी एक अर्भक असल्याचं निदान झालं होतं. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलं होतं. या घटनेची देशात चर्चा झाली होती. 5 लाख मुलांमधून एखाद्या मुलामध्ये असा प्रकार आढळून येतो. या प्रकाराला वैद्यकीय भाषेत ‘फिटस इन फिटो’ म्हणतात. बाळाचे वजन 2 किलो 225 ग्रॅम इतके असून, केवळ बाळालाच विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अमरावतीच्या सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये आज सकाळी 11 वाजता या चार दिवसाच्या बाळावर शस्त्रक्रिया पार पडली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -