Thursday, February 6, 2025
Homeक्रीडादिग्गज शेवटच्या सामन्यासाठी सज्ज, ‘शतक’ करुन निवृत्त होणार

दिग्गज शेवटच्या सामन्यासाठी सज्ज, ‘शतक’ करुन निवृत्त होणार

टीम इंडिया टी 20i मालिकेनंतर जबरदस्त विजयानंतर इंग्लंडविरुद्ध वनडे सीरिज खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. उभयसंघातील पहिला सामना हा गुरुवारी 6 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन हे नागपुरातील व्हीसीए स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. तर दुसऱ्या बाजूला श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा आणि अंतिम कसोटी सामन्यालाही आज 6 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. दिग्गज खेळाडू हा सामना खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला कायमचा अलविदा करणार आहे.

 

दिमुथ करुणारत्ने त्याच्या कसोटी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीतील शेवटचा सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. दिमुथच्या कसोटी कारकीर्दीतील हा 100 वा कसोटी सामना असणार आहे. दिमुथ अशापक्रारे कसोटी सामन्यांचं ऐतिहासिक ‘शतक’ पूर्ण करुनच निवृत्त होणार आहे. विशेष म्हणजे दिमुथने जिथून कसोटी पदार्पण केलं, तिथेच तो निवृत्त होत आहे. हा दुसरा सामना गॉलमध्ये खेळवण्यात येणार आहे. दिमुथने 2012 साली याच मैदानातून टेस्ट डेब्यू केला होता.

 

विजयी निरोपासह मालिका बरोबरीत सोडवण्याचं आव्हान

दिमुथने पहिल्या कसोटी सामन्यानंतरच निवृत्त होणार असल्याचं जाहीर केलं होतं. ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकून विजयी सुरुवात केली. आता दिमुथ निवृत्त होणार असल्याने त्याला विजयाने निरोप देण्याचा प्रयत्न इतर सहकाऱ्यांचा असणार आहे. तसेच यजमानांसमोर मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे श्रीलंका या दुहेरी आव्हानाचा कशाप्रकारे सामना करते? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

 

श्रीलंका टीम : धनंजया डी सिल्वा (कर्णधार), कुसल मेंडिस (विकेटकीपर), ओशादा फर्नांडो, दिमुथ करुणारत्ने, दिनेश चंडिमल, अँजेलो मॅथ्यूज, कामिंदू मेंडिस, प्रभात जयसूर्या, जेफ्री वांडरसे, निशान पेरिस, आशिथा फर्नांडो, लहीरु कुमारा, विश्वा फर्नांडो, सदीरा समरविक्रमा, पाथुम निसांका, सोनल दिनुषा, लाहिरू उदारा आणि मिलन प्रियनाथ रथनायके.

 

ऑस्ट्रेलिया संघ : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), उस्मान ख्वाजा,ट्रेव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस, ब्यू वेबस्टर, मिचेल स्टार्क, मॅथ्यू कुहनेमन, नॅथन लियॉन, टॉड मर्फी, नॅथन मॅकस्वीनी, सीन एबॉट, कूपर कॉर्नली आणि स्कॉट बॉलँड.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -