Friday, February 7, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी : खो-खो स्पर्धेत बालभारत क्रीडा मंडळाला विजेतेपद

इचलकरंजी : खो-खो स्पर्धेत बालभारत क्रीडा मंडळाला विजेतेपद

येथील डायनॅमिक स्पोर्टस् क्लबच्या वतीने आणि कोल्हापूर खो-खो असोशिएशनच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या 14 वर्षाखालील खो-खो स्पर्धेत चुरशीने खेळल्या गेलेल्या अटीतटीच्या अंतिम लढतीत बालभारत क्रीडा मंडळाने इलेव्हन संघाला पराभूत करुन विजेतेपद मिळविले. तर इलेव्हन संघाला उपविजेतेपद मिळाले. तर जयहिंद मंडळ आणि राजमाता जिजाऊ या मुलींच्या संघात प्रदर्शनीय सामना खेळविण्यात आला. त्यामध्ये जयहिंद मंडळाने आक्रमक खेळी करत राजमाता जिजाऊ संघावर मात करत विजय प्राप्त केला.

डायनॅमिक स्पोर्टस् क्लबच्या मैदानावर दोन दिवस या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 12 संघ सहभागी झाले होते. सर्वच सामने अत्यंत चुरशीने खेळले गेले. त्यामध्ये बालभारत क्रीडा मंडळ, शिवछत्रपती क्रीडा संघ, इलेव्हन संघ आणि जयहिंद मंडळ या चार संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. उपांत्य फेरीत बालभारतने शिवछत्रपती संघाला तर इलेव्हन संघाने जयहिंद मंडळावर मात करुन अंतिम फेरी गाठली. बालभारत विरुध्द इलेव्हन संघ हा अंतिम सामना अत्यंत चुरशीचा व अटीतटीचा झाला. दोन्ही बाजूकडील खेळाडूंच्या दमदार खेळीने निर्धारीत वेळेत हा सामना बरोबरीत राहिला. त्यामुळे दोन्ही संघात अधिक वेळ देऊन सामना झाला. त्यामध्ये बालभारतने इलेव्हन संघाला पराभूत करुन विजेतेपद मिळविले.

अंतिम सामान्याचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. स्पर्धेनंतर प्रमुख अतिथी शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरिक्षक सचिन पाटील, गावभाग पोलिस ठाण्याचे निरिक्षक दत्तात्रय देशमुख, अहमद मुजावर यांच्या हस्ते स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ पार पडला. तर विश्‍वविजेती खो-खो पटू वैष्णवी पोवार हिच्या हस्ते वैयक्तिक बक्षिसांचे वितरण करण्यात आले. स्पर्धेत जियान गोरवाडे-डायनामिक्स स्पोर्टस् (उत्कृष्ट खिलाडूवृत्ती), आर्यन कुकडे – शिवछत्रपती क्रीडा संघ (उत्कृष्ट डाईव्ह), अर्णव वीर-बालभारत क्रीडा मंडळ (उत्कृष्ट संरक्षक), राजवीर वेर्णेकर-इलेव्हन संघ (उत्कृष्ट आक्रमक), रुद्र यादव-बालभारती क्रीडा मंडळ (सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू) यांना गौरविण्यात आले.

यावेळी अमित पाटील, अभिजित शिंदे, कोमल पोवार, सदाशिव पोकार्डे, संजय कुडचे, शेखर शहा, अमोल अडसुळ, बाळू काकडे, तात्यासाहेब कुंभोजे, अमानुल्ला आगा, अमोल लंगोटे, दिगंबर वेर्णेकर, सागर येळरुटे, राहुल पाटील, राहुल कुलकर्णी, अमित कागले, शांतीनाथ मुसळे आदींसह खेळाडू उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -