शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथील विषबाधा प्रकरणातील रुग्णांना अत्यावश्यक सेवा व औषधोपचार तातडीने उपलब्ध व्हावेत, त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये यासाठी आमदार राहुल आवाडे हे स्वत: धडपडत होते. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आवश्यक ते साहित्य पुरविण्यासाठी पाठपुरावा करत त्यांनी सलाईन स्टँड, बेड, औषधे आदी आणून दिली. याद्वारे त्यांनी लोकप्रतिनिधी कसा असावा हे दाखवून दिल्याची चर्चा होती.
शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी येथे अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडल्यानंतर बुधवार पहाटेपासून प्रशासकीय यंत्रणा गतिमान झाली आहे. बाधित रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल होत आहेत. परिणामी येथे उपलब्ध असणारी यंत्रणा अपुरी पडत असल्याचे लक्षात आले. त्याबाबत माहिती घेत आमदार राहुल आवाडे यांनी गुरुवारी स्वत:च्या गाडीतून वैद्यकीय साहित्य आणत इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयास दिले. पाठपुराव करत त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रुग्णालयासाठी 78 सलाईन स्टॅड, 80 बेड तसेच 300 रुग्णांना आवश्यक असणारी औषधे ते स्वत: घेऊन इस्पितळात आले होते.
यावेळी त्यांनी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. भाग्यरेखा पाटील यांच्यासह अन्य वैद्यकीय अधिकार्यांसोबत सर्व वॉडॅची पाहणी करत तेथील तेथील रुग्णांशी संवाद साधत विचारपूस केली. त्याचबरोबर रुग्णांच्या मदतकार्यात सक्रीय सहभागही नोंदवला.