2025 मध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळ्यांच्या किंमतीती मोठे बदल झाले आहे. आता रेटिंग एजन्सी क्रिसिलने जाहीर केलेल्या अहवालानुसार शाकाहारी आणि मांसाहारी थाळीच्या किमती वाढल्याचे चित्र दिसत आहे. ज्यामुळे मासिक किमतीत तफावत स्पष्ट झाली आहे. या कमी वाढण्यामागे काही महत्वाची कारणे समोर आली आहेत. तर चला या दरांबद्दल आणि कारणांबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
शाकाहारी थाळीच्या किंमतीत वाढ –
शाकाहारी थाळीच्या किमतीत, बटाटे, कडधान्ये, आणि तेल यांच्या किमतीत वाढ झाली आहे. बटाट्याच्या किमतीत 35% वाढ झाली आहे, डाळीच्या किमतीत 7%, आणि तेलाच्या किमतीत 17% वाढ झाल्यामुळे शाकाहारी थाळीची किमत 28.7 रुपये प्रति थाळी वाढली आहे. पण , इंधन दरात 11% कपात झाल्यामुळे, महागाई काही प्रमाणात कमी झाली आहे. एक वर्षापूर्वी शाकाहारी थाळीची किमत 28 रुपये प्रति थाळी होती, जी आता वाढली आहे.
मांसाहारी थाळीच्या किमतीत वाढ –
शाकाहारी थाळीसोबतच मांसाहारी थाळीच्या किमतीत वाढ झालेली दिसून येत आहे , ज्यात ब्रॉयलर चिकनचा मोठा वाटा आहे. यंदा मांसाहारी थाळीची किंमत 60.6 रुपये प्रति थाळी झाली आहे, एका वर्षापूर्वी ती 52 रुपये होती. ब्रॉयलर चिकनच्या किमतीत वाढ आणि इतर शाकाहारी घटकांच्या किमतीतील बदलामुळे हे बदल दिसून आले आहेत.