Sunday, July 27, 2025
Homeमहाराष्ट्र5 लाख अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेतले जाणार का? आदिती तटकरेंची...

5 लाख अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेतले जाणार का? आदिती तटकरेंची सर्वात मोठी अपडेट

मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीन योजनेचा लाभ घेणाऱ्या तब्बल पाच लाख महिला या अपात्र ठरवण्यात आल्या आहेत. ज्या महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे, त्या महिलांना या योजनेंतर्गत मिळणारा लाभ देखील आता बंद होणार आहे. मात्र आता अनेकांना असा प्रश्न पडला आहे की? ज्या महिलांना अपात्र ठरवण्यात आलं, त्यांच्याकडून यापूर्वी वितरीत करण्यात आलेले पैसे देखील वसूल केले जाणार का? याबाबत आता मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी अपडेट दिली आहे.

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही. तथापि, कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाही. म्हणूनच कोणत्याही लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत (जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४) देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी !’ असं ट्विट आदिती तटकरे यांनी केलं आहे. त्यामुळे या महिला जरी अपात्र ठरल्या असल्या तरी त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

कोणत्या महिलांना मिळणार नाही लाभ?

 

दरम्यान याबाबत देखील मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

 

‘दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून वगळण्यात येत आहे.

 

अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालील प्रमाणे :

 

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला – २,३०,००० वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या महिला – १,१०,००० कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या,स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला – १,६०,००० एकुण अपात्र महिला – ५,००,०००

 

सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द आहे !’ असं ट्विट आदिती तटकरे यांनी केलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -