टीम इंडियाने कटकमधील बाराबती स्टेडियममध्ये झालेला दुसरा सामना 4 विकेट्सने जिंकला. कर्णधार रोहित शर्मा याने मॅचविनिंग खेळी केली. रोहितने स्फोटक शतकी खेळी केली. रोहितने 119 धावा केल्या.
रोहितने या शतकी खेळीत 7 षटकार खेचले. रोहित यासह ख्रिस गेल याला मागे टाकत वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स ठोकणारा दुसरा फलंदाज ठरला. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम हा पाकिस्तानचा माजी ऑलराउंडर शाहीद अफ्रिदी याच्या नावावर आहे.
रोहितने षटकारांच्या विक्रमासह काही रेकॉर्ड ब्रेक केलेत. रोहितचा कटकमधील कर्णधार म्हणून 50 एकदिवसीय सामना होता. रोहितने हा सामना जिंकत अनेक खेळाडूंना मागे टाकलं आहे.
रोहितचा कर्णधार म्हणून हा 50 एकदिवसीय सामन्यांमधील 36 वा विजय ठरला. रोहित यासह संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानी पोहचला.
या यादीत टीम इंडियाचा विराट कोहली, रिकी पॉन्टिंग आणि लॉयड हे तिघे पहिल्या स्थानी आहेत. या तिघांनी वनडेत कॅप्टन म्हणून 50 सामन्यांनंतर प्रत्येकी 39-39 वेळा विजय मिळवला होता.
दरम्यान टीम इंडिया इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत 2-0 अशा फरकाने आघाडीवर आहे. उभयसंघातील तिसरा आणि अंतिम सामना हा बुधवारी 12 फेब्रुवारीला होणार आहे.