कापड व्यावसायिकाच्या घरातून सोन्याचे दागिने व चांदीचे साहित्य चोरीला गेल्याप्रकरणी संशयित दोन घरेलू महिला कामगारांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सुनंदा प्रकाश जावळे, ज्योती लाखे ( दोघी रा. लालनगर, इचलकरंजी) अशी त्यांची नावे आहेत.
तीन तोळे सोन्याची दोन पदरी माळ, १२ भार वजनाचे चांदीचा ग्लास तसेच चांदीचे ताट व लहान आरत्या असा एकूण १ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची फिर्याद सुदीप अनिल वडिंगे (वय ४३) यांनी पोलिसात दिली.
सुदीप वहिंगे यांचे स्टेशन रोडवर श्री लक्ष्मी निवास नावाचे घर आहे. दरम्यान घरातून मागील तीन दिवसाच्या कालावधीत सोन्याचे दागिने, चांदीच्या आरत्यासह साहित्य चोरीला गेले.
घरात काम करण्यासाठी येणाऱ्या दोन महिलांवर चोरीचा संशय घेत याबाबतची तक्रार वडिंगे यांनी पोलीस ठाण्यात दिली.
त्यानुसार पोलिसांनी संशयित महिला सुनंदा जावळे व ज्योती लाखे या दोघींवर गुन्हा दाखल करून त्यांच्याकडे चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी केली.