Monday, March 24, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी : जुना चंदूर रोडवर उरूस भरवण्यावरून तणाव

इचलकरंजी : जुना चंदूर रोडवर उरूस भरवण्यावरून तणाव

येथील जुना चंदर रोडवरील ओक्याजवळ भरविण्यात येत असलेला उरूस विरोधात हिंदुत्ववादी कार्यकत्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने पोलिसांच्या मध्यस्थीने मंडप आणि विद्युत रोषणाई हटवण्यात आली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

या संदर्भात घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, जुना चंदूर रोडवरील ओडयाजबळ फारणे यांच्या मालकीची २४ गुंठे जागा असून या जागेतच एक छोटासा दर्गा आहे. या दर्गाच्या ठिकाणी बुधवार आगि गुरुवार असे दोन दिवस उरुस भरविण्यात येत होता. त्याची माहिती समजल्यानंतर त्यावर आक्षेप घेत काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते बुधवारी घटनास्थळी दाखल झाले.

 

यावेळी कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेताना त्याठिकाणी घातलेला मंडप काढून घेण्यास तसेच विद्युत रोषणाईही काढण्यास भाग पाडल्यामुळे त्याठिकाणची परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. या घटनेची माहिती समजताच शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील हे सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

 

त्यांनी जागा मालक, उरुस आयोजक आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करताना शांतता वच सलोखा राखण्याचे आवाहन केले, याठिकाणी असलेले बेकायदेशीर थडगे हटवण्याची मागणी कार्यकत्यांनी केली. अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनीही घटनास्थळी भेट देत दोन्ही बाजू समजावून घेतली. पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -