दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगलेच यश मिळाले. जवळपास २७ वर्षानंतर भाजप दिल्लीत सत्ता स्थापन करणार आहे. भाजप सरकार आल्यानंतर अनेक बदल होणार आहेत.
भाजप दिल्लीतील अनेक योजनांमध्ये महत्त्वाचे बदल करणार आहेत.
दिल्लीतील महिलांना आता लवकरच २५०० रुपये मिळणार आहे. याआधी आम आदमी पार्ट सरकार महिला सन्मान योजनेत दर महिन्याला १ हजार रुपये देत होती. मात्र, भाजप सरकारने २५०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते.
भाजप सरकार आल्यानंतर ही महिला सन्मान योजना बंद होईल. भाजप सरकार महिलांसाठी नवीन योजना सुरु करणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत भाजपने विधानसभा निवडणुकांपूर्वी घोषणा केली होती.
दिल्लीतील महिलांसाठी नवीन योजना राबवली जाणार आहे. या योजनेत दर महिन्याला १ हजारऐवजी २५०० रुपये देण्याची घोषणा केली होती. ही योजना कधीपासून लागू होणार असा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाला आहे. या योजनेसाठी अर्ज कसा करायचा याबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहे.
मिडिया रिपोर्टनुसार, मार्च महिन्यापासून महिलांना दर महिन्याला २५०० रुपये दिले जाऊ शकतात. याबाबत नरेंद्र मोदी यांनी माहिती दिली होती. नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते की, आंतरराष्ट्रीय महिला दिवशी महिलांना २५०० रुपये देण्यास सुरुवात केली जाईल. आंतरराष्ट्रीय महिला दिन ८ मार्च रोजी साजरा केला जातो.त्यामुळे त्याआधी महिलांना हे पैसे मिळू शकतात.
दिल्लीमध्ये भाजपला बहुमत मिळाले आहे. भाजपने अद्याप सत्तास्थापन केले नाही. लवकरच भाजप सत्ता स्थापन करेन. सरकार स्थापन झाल्यानंतर या योजनेबाबत अधिकृत घोषणा केली जाईल. त्यानंतर महिलांना पैसे कधी मिळणार, हे सांगितले जाईल.
सध्या या योजनेबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या योजनेची अर्जप्रक्रिया कधीपासून सुरु होणार?या योजनेचे नियम काय असणार?अर्ज करण्यासाठी कोणते कागदपत्र लागणार? याबाबत सविस्तर माहिती लवकरच दिली जाईल.