दक्षिणेतील अभिनेता नागा चैतन्यचा नवीन चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचे नाव थंडेल आहे. या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री साई पल्लवी देखील आहे, चित्रपटाच्या रिलीज आधी दोघांनीही खूप प्रमोशन केलं होतं. चित्रपट रिलीजनंतर त्याला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहणं मात्र महत्त्वाचं होतं.
फक्त 10 दिवसांमध्येच 100 कोटींची कमाई
आतापर्यंतचे नागा चैतन्यचे बरेच चित्रपट हे फ्लॉपच झाले होते. मात्र या चित्रपटाकडून सर्वांनाच अपेक्षा होत्या आणि अखेर त्या अपेक्षा सत्यात उतरल्या. नागा चैतन्यचा हा चित्रपट तुफान चालतोय. हा चित्रपट प्रदर्शित होऊन 10 दिवस झाले आहेत आणि या 1o दिवसांत चित्रपटाने 100 कोटी कमावले आहेत. त्यामुळे आता साई पल्लवी आणि नागाच्या जोडीला चाहत्यांकडून हिरवा कंदील मिळाला आहे. हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे जो परदेशातही चांगला कलेक्शन दोरदार करत आहे.
नागा चैतन्यसाठी अभिनेत्री लकी
दरम्यान हा चित्रपट नागा चैतन्यच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाचे यश हे सर्व टीमची मेहनत असली तरी नागा चैतन्यसाठीही साई पल्लवी खऱ्या अर्थाने लकी ठरली असही म्हटलं जात आहे.
परदेशातही चित्रपटाचा बोलबाला
‘थंडेल’ हा चित्रपट 3 वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. पण हिंदी प्रेक्षकांकडून चित्रपटाला फारसा पाठिंबा मिळताना दिसत नाहीये. मात्र या चित्रपटाला परदेशात खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. परदेशात चित्रपटाने पहिल्या दिवशी 11.5 कोटी रुपये कमावले. पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने 36.40 कोटी रुपये कमावले.
पण आता भारतात या चित्रपटाने 10 दिवसांत 56 कोटी रुपये कमावले आहेत. भारतात चित्रपटाचे कलेक्शन कमी झाले असले तरी, जगभरात त्याचे कलेक्शन उत्तम चालले आहे. आणि या 10 दिवसांची कमाई पाहिली तर ती सर्व मिळून ती 100 कोटींच्या आसपास जाताना दिसत आहे.
बजेटच्या दुप्पट कमाई
जर आपण त्याच्या जगभरातील कलेक्शनवर नजर टाकली तर, चित्रपटाच्या कलेक्शनपैकी अर्धा भाग परदेशातून आला आहे. या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर 10 दिवसांत जगभरात 100 कोटी रुपये कमावले आहेत. यासह, हा चित्रपट नागा चैतन्यच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. तसेच, हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात जलद कमाई करणारा चित्रपट आहे.
साई पल्लवी खऱ्या अर्थाने लकी ठरली
या चित्रपटात नागा चैतन्यसोबत मुख्य अभिनेत्री साई पल्लवी आहे. या चित्रपटात साई पल्लवी त्याच्यासाठी खूप लकी ठरली असं म्हटलं जात आहे. कारण नागा चैतन्याच्या 16 वर्षांच्या कारकिर्दीत आतापर्यंत त्याच्या एकाही चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा ओलांडलेला नव्हता. पण आता या चित्रपटाने हा चमत्कार केला आहे. या चित्रपटाने अवघ्या 10 दिवसांत बजेटपेक्षा दुप्पट कमाई केली आहे. या कमाईत अजून भर पडण्याची शक्यता आहे.