ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 17 February 2025) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
मेष राशी (Aries Daily Horoscope)
मेष राशीच्या व्यक्तींना आज मेहनतीचे फळ मिळणार आहे. तुमच्या कामातील अडथळे आपोआप दूर होतील. नातेवाईक किंवा शुभचिंतकांकडून तुम्हाला एखादी गुडन्यूज मिळेल. बेरोजगार लोकांना रोजगार मिळेल. नोकरी करणाऱ्यांना आज वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस फारच शुभ असणार आहे. तुम्हाला तुमचे मत जोडीदारासमोर मांडताना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
वृषभ राशी (Taurus Daily Horoscope)
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस थोडा चढ-उताराचा असेल. रागावर नियंत्रण ठेवा. अचानक एखादा मोठा खर्च उद्भवू शकतो. यामुळे तुमचे बजेट बिघडू शकते. आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी तळलेले पदार्थ खाणे टाळा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. व्यवसायात मंदी येऊ शकते. या आठवड्यात गुंतवणूक करणे टाळा.
मिथुन राशी (Gemini Daily Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांनी काही गोष्टींबद्दल मौन बाळगावे. उधार दिलेले पैसे परत मिळतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. ऑफिसमध्ये विरोधकांशी संघर्ष करण्यापेक्षा कामावर लक्ष केंद्रीत करा. आज तुम्हाला आर्थिक लाभ संभवतो. तसेच तुमच्या घरात एखाद्या प्रिय व्यक्तीच्या आगमनामुळे आनंदाचे वातावरण असेल. एखाद्या ज्येष्ठ सदस्याच्या मदतीने तुमच्या कौटुंबिक समस्या सोडवण्यास मदत होईल.
कर्क राशी (Cancer Daily Horoscope)
कर्क राशीच्या लोकांनी आजचे काम उद्यावर ढकलू नये. लोकांशी सभ्यतेने वागा. तुमच्या नियोजित कामात अचानक काही अडथळे येऊ शकतात. ज्यामुळे तुम्ही दु:खी व्हाल. आजचा दिवस तुमच्यासाठी खूपच आव्हानात्मक असू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींवर आज कामाचा भार पडेल. भागीदारीत व्यवसाय करत असाल तर व्यवहार काळजीपूर्वक करा. जोडीदाराशी एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात
सिंह राशी (Leo Daily Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. आज तुम्हाला अधिक सतर्क राहावे लागेल. तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल. अनावश्यक खर्च टाळा, अन्यथा तुम्हाला पैसे उधार घ्यावे लागू शकतात. रागावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक ताण घेणे टाळा.
कन्या राशी (Virgo Daily Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रतिकूल असणार आहे. पण कोणत्याही कामात निष्काळजीपणा करु नये, अन्यथा तुमच्या वाट्याला आलेले यश हातातून निसटून जाईल. आज तुमची खूप जास्त धावपळ होईल. जमीन किंवा घर खरेदी-विक्री व्यवहाराबद्दल कागदपत्रे नीट तपासा. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. आज जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीवरून तणाव निर्माण होऊ शकतो.
तूळ राशी (Libra Daily Horoscope)
तूळ राशीच्या व्यक्तींनी कामात शॉर्टकट घेणे टाळावे, अन्यथा मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीनुसार प्रोत्साहन आणि कौतुक मिळेल. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून योग्य सहकार्य आणि पाठिंबा मिळेल. आज तूळ राशीच्या व्यक्तींनी काळजीपूर्वक गाडी चालवावी. प्रवासादरम्यान तुमच्या आरोग्याची आणि सामानाची विशेष काळजी घ्या.
वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope)
वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अपेक्षित फळ देणार असणार आहे. नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांच्या सूचनेचे पालन करावे. तसेच वेळेत काम करण्याचा प्रयत्न करा अन्था तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्ही परदेशात करिअर किंवा व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यात तुम्हाला यश मिळेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्याल.
धनु राशी (Sagittarius Daily Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंद देणार असणार आहे. आज तुमच्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडताना दिसणार आहेत. तुमची दीर्घकाळापासून प्रलंबित कामे लवकर पूर्ण होतील. आज तुमच्या लोकप्रियतेत वाढ होईल. आर्थिक दृष्टिकोनातून आजचा तुमच्यासाठी उत्तम असेल. नोकरी करणाऱ्यांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
मकर राशी (Capricorn Daily Horoscope
मकर राशींच्या व्यक्तींना आज अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागू शकते. यामुळे तुमचे रागावरील नियंत्रण कमी होईल. लोकांशी वाद घालणे टाळा. खर्च वाढू शकतो. ज्यामुळे बजेट बिघडू शकते. पैशांची गुंतवणूक टाळा. प्रवासादरम्यान विशेष काळजी घ्या. इतरांशी नम्रतेने वागले पाहिजे.
कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope)
कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज कोणतीही समस्या उद्भवली तर संयम गमावू नका. शांत मनाने विचार करा. नोकरी करणाऱ्या लोकांवर अतिरिक्त कामाचा ताण येऊ शकतो. तुम्हाला अचानक लांब पल्ल्याच्या प्रवास करावा लागू शकतो. प्रवास आनंददायी ठरेल आणि नवीन मित्र मिळतील. व्यवसाय करण्यापूर्वी तुमच्या हितचिंतकांचा सल्ला घ्या. वैवाहिक जीवनात आनंद राहील.
मीन राशी (Pisces Daily Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस धावपळीचा असेल. तुमच्यावर कामाचा अतिरिक्त ताण असेल. अनावश्यक खर्च करणे टाळा. धोकादायक गुंतवणूक टाळा. नोकरी मिळविण्यासाठी तुम्हाला अजून थोडा वेळ वाट पाहावी लागेल. प्रेमसंबंधात दिखावा टाळा.