Thursday, February 20, 2025
Homeमहाराष्ट्रलाडक्या बहिणींसाठी आता 'छावा' चित्रपटाचा मोफत शो, पण कुठे अन् केव्हा? जाणून...

लाडक्या बहिणींसाठी आता ‘छावा’ चित्रपटाचा मोफत शो, पण कुठे अन् केव्हा? जाणून घ्या…

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘छावा’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

 

 

पहिल्या तीन चार दिवसांत या चित्रपटाने मोठी कमाई करत नवा रेकॉर्डही बनवला आहे. हा चित्रपट बघितल्यानंतर प्रत्येक जण भावूक होताना दिसून येतो आहे. अनेक जण विक्की कौशलच्या अभिनयाचं कौतुक करतो आहे.

 

अशातच आता महिलांना संभाजी महाराजांचा इतिहास पडद्यावर बघता यावा, यासाठी मोफत शो आयोजित करण्यात आला आहे. अहिल्यानगरमध्ये आमदार संग्राम जगताप यांनी महिलांसाठी छावा चित्रपटाचे मोफत शो आयोजित केले आहेत. तसेच त्यांनी हा चित्रपट राज्यात टॅक्स फ्री करावा, अशी मागणीही केली आहे.

 

सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती

 

आमदार संग्राम जगताप यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली. ”छत्रपती संभाजी महाराजांच्या धगधगत्या इतिहासातून महिलांना प्रेरणा मिळावी, यासाठी अहिल्यानगरमध्ये महिलांसाठी ‘छावा’ चित्रपटाचे मोफत शो आयोजित केले आहेत, महिलांनी छत्रपती संभाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास नक्की अनुभवावा”, असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

कुठे अन् केव्हा?

 

तसेच हे शो नेमके कधी होणार याची माहितीही त्यांनी या पोस्टमध्ये दिली आहे. ”छावा चित्रपटाचे मोफत शो १७ ते २२ फेब्रुवारीदरम्यान (सोमवार ते शनिवार) कॉनप्लेक्स थिएटर, कोहिनूर मॉल येथे (दुपारी ४:३० वाजता) आणि सिनेलाइफ थिएटर, नगर कॉलेज जवळ, जुडीओच्या वरती अहिल्यानगर येथे (दुपारी ३:३० वाजता) असणार आहेत”, असेही त्यांनी सांगितलं.

 

महिलांनी व्यक्त केलं समाधान

 

संग्राम जगताप यांच्या या निर्णयानंतर महिलांनीही समाधान व्यक्त केलं आहे. ”आतापर्यंत छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास ऐकला आणि वाचला होता. मात्र आता छावा चित्रपटामुळे वाचलेला इतिहास प्रत्यक्ष बघता येणार आहे. याचं समाधान आहे”, अशा भावना लाडक्या बहिणींनी व्यक्त केल्या आहेत.

 

राजकीय चर्चांना उधाण

 

दरम्यान, महिलांसाठी मोफत शो आयोजित केल्यानंतर आता राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे. विधानसभेत लाडक्या बहिणींना महायुतीला भरभरून मतदान केलं होतं, आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने अशा प्रकारचे निर्णय घेतले जात असल्याचं बोललं जातं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -