सरकार नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी हाती आली आहे. भारतीय स्टेट बँकेने Concurrent Auditor पदासाठी बंपर भरती काढण्यात आली आहे. या पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
या पदासाठी इच्छुक आणि योग्य उमेदवारांना एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करता येईल.
११९४ पदांसाठी भरती
भारतीय स्टेट बँकेच्या १९९४ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. बँकिंग क्षेत्रात नोकरी करु इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रियेची सुरुवात झाली आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही १५ मार्च २०२५ आहे. या तारखेनंतर नोकरीसाठी अर्ज करता येणार नाही. त्यामुळे उमेदवारांना १५ मार्चआधी अर्ज भरावा लागणार आहे.
कोण-कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता?
अधिकृत सूचनेत उमेदवारांना नोकरीच्या अटीविषयी माहिती देण्यात आली आहे. तसेच त्यात अटी आणि पात्रतेविषयी माहिती देण्यात आली आहे. या पदासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता आहे. या कागदपत्रांमध्ये असाईंटमेंट तपशील, ओळख पत्र, वयाचा पुरावा या कागदपत्रांसहित फॉर्म अपलोड करावा लागणार आहे. फॉर्म न भरणाऱ्या उमेदवारांची नावे शॉर्टलिस्ट होणार नाहीत.
लेखी परीक्षा न देता मिळवा नोकरी
शॉर्टलिस्ट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांकडे योग्यता आणि अनुभव असला पाहिजे. बँकेची शॉर्टलिस्टिंग समिती पुढील बाबी ठरवणार आहे. शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. ही मुलाखत १०० गुणांची असेल. यामध्ये कोणतेही पत्रव्यवहार ग्राह्य धरले जाणार नाही. मुलाखत झाल्यानंतर मेरीट लिस्ट गुणांच्या आधारावर जाहीर होईल. ज्या उमेदवारांचे गुण सारखे असतील, त्यानंतर उमेदवारांना वयाच्या आधारावर प्राधान्य दिलं जाईल.