शेअर बाजारातील गुंतवणूक अनेक गुंतवणूकदारांना फायदेशीर ठरते. परंतु बाजारात गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणे आणि सतत लक्ष ठेवणे गरजेचे आहे. गेल्या पाच वर्षांत शेअर बाजारातील एका शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. पाच वर्षांपूर्वी केवळ 13.40 रुपयांवर असलेला हा शेअर आता 1,999.90 रुपयांवर पोहचला आहे. म्हणजेच पाच वर्षांत 14,825% रिटर्न या शेअरने दिले आहे. पाच वर्षांपूर्वी या शेअरमध्ये एका लाखाची गुंतवणूक करणारा गुंतवणूकदार आता कोट्यधीश झाला आहे. त्याचे 1 लाखाचे दीड कोटी पाच वर्षांत बनले आहे. Indo Thai Securities कंपनीचा हा शेअर आहे.
या वर्षी 53 टक्के वाढ
Indo Thai Securities कंपनीची कामगिरी यंदाही जोरदार राहिली. मागील आर्थिक वर्षात CY21 मध्ये 1,205% तर CY22 मध्ये 456% वाढ झाली आहे. यंदाच्या वर्षात म्हणजे सन 2024 मध्ये हा शेअर 53 टक्के वाढला आहे. सध्या शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर घसरण दिसत आहे. परंतु मागील सात महिन्यत या शेअरमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यात 80.46% टक्के वाढ झाली आहे. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात 55.51 टक्के वाढ झाली होती.
अशी वाढत गेली गुंतवणूक
Indo Thai Securities कंपनीमध्ये गुंतवणूकदाराने पाच वर्षांपूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि ती गुंतवणूक आजपर्यंत कायम ठेवली असती तर त्याचे मूल्य 1.49 कोटी रुपये झाले असते. यावरुन शेअर बाजारात चांगले शेअर निवडले आणि ते शेअर दीर्घकाळसाठी ठेवले तर चांगला परतावा मिळू शकतो, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.
गेल्या एका महिन्यात इंडो थाई सिक्युरिटीजचे शेअर्स 1.65 टक्क्यांनी वाढले आहेत. त्याच वेळी, गेल्या एका वर्षात 506.52 टक्के वाढ दिसून आली आहे. त्याच वेळी, कंपनीच्या समभागांची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 667.00 रुपये आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये 5 वर्षांत 8233.33 टक्क्यांनी वाढ झाली आहे. शुक्रवारी ट्रेडिंग दरम्यान कंपनीचे मार्केट कॅप BSE वर 2,031.66 कोटी रुपये होते.