पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे. नरेंद्र मोदी बिहारमधील भागलपूर येथील कार्यक्रमातून 2000 रुपयांचं वितरण करतील.
हा कार्यक्रम दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात आयोजित कार्यक्रमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर 19 व्या हप्त्याची रक्कम पाठवण्यात येईल. देशभरातील जवळपास 9 कोटी 70 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम पाठवण्यात येईल.
पीएम किसान सन्मान निधी योजनेला आता सहा वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्तानं सीएससी केंद्रावर शेतकऱ्यांना आमंत्रित करावं असं आवाहन करण्यात आलं आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे आतापर्यंत शेतकऱ्यांना 18 हप्त्यांचे 36000 रुपये मिळाले आहेत. आज 19 वा हप्ता मिळणार आहे.
देशभरातील 9 कोटी 70 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2000 रुपयांप्रमाणं 21000 कोटी रुपये पाठवले जाणार आहेत. पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. मात्र, शेतकऱ्यांना ई केवायसी, फार्मर रजिस्ट्रेशन, बँक खात्याचा डीबीटी पर्याय सुरु करणे आणि जमीन पडताळणी करुन घेणं आवश्यक आहे.