Friday, July 25, 2025
Homeमहाराष्ट्रखुशखबर !! महिलांसाठी 50% सवलत ! महाराष्ट्र पर्यटन महामंडळाची मोठी घोषणा

खुशखबर !! महिलांसाठी 50% सवलत ! महाराष्ट्र पर्यटन महामंडळाची मोठी घोषणा

महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) ने राज्यातील महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. या घोषणेत महिला पर्यटकांना फिरण्यासाठी 50% डिस्काउंट दिला जाणार आहे. या निर्णयामुळे अनेक महिलांना मनसोक्त फिरता येईल. हि महत्वाची घोषणा आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ( 8 मार्च ) करण्यात आली आहे. तर या योजनेचा कालावधी काय असणार ? सवलतीचा लाभ महिलांना कसा मिळेल? याची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत.

 

महिलांसाठी 50% सवलत –

महिलांना फिरण्याचा मनसोक्त आनंद मिळावा , यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून (एमटीडीसी) महिलांसाठी 50% सवलत दिली गेली आहे . हि सवलत 1 ते 8 मार्च 2025 कालावधीसाठी मिळणार आहे. 2024 मध्ये सुद्धा हि सवलत देण्यात आली होती , तेव्हाही या सवलतीचा लाभ अनेक महिलांनी घेतला होता, त्यावेळी जवळपास 1500 महिलांनी लाभ घेतला. यंदाही या योजनेला जोरदार प्रतिसाद मिळणार आहे. यासाठी शासनाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत.

 

30 दिवसांची सवलत महिलांना मिळणार –

1 ते 8 मार्च 2025 आणि वर्षभरातील इतर 22 दिवस अशी एकूण 30 दिवसांची सवलत महिलांना मिळणार आहे. 22 दिवसांची अधिक माहिती एमटीडीसीच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे. पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगितले कि , महिलांना या सवलतीचा लाभ www.mtdc.co या अधिकृत वेबसाईटला जाऊन घेता येईल. तसेच हा महत्वपूर्ण उमक्रम ‘आई’ महिला केंद्रित/लिंग समावेशक पर्यटन धोरणांतर्गत राबवला जात आहे.

 

महिला बचत गटांसाठी सुविधा –

पर्यटन स्थळांवर महिला बचत गटांसाठी स्टॉल्सची सुविधा देखील उपलब्ध असणार आहे. यासोबतच महिलांसाठी साहसी आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. या विशेष उपक्रमामुळे महिलांना पर्यटन क्षेत्राशी जोडता येईल आणि त्यांचे सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणही होईल, असा विश्वास एमटीडीसी आणि राज्य शासन व्यक्त करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -