Tuesday, March 4, 2025
Homeराजकीय घडामोडीधनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देणार, दिवसही ठरला? फेसबुक पोस्टने चर्चांना उधाण

धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देणार, दिवसही ठरला? फेसबुक पोस्टने चर्चांना उधाण

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर आता मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे हे मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

 

करुणा शर्मा यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टवर दावा केला आहे. वाल्मिक कराड हा मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे विरोधकांनी या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा लिहून घेतला असल्याचा दावा करुणा शर्मा यांनी केला.

 

संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाच सूत्रधार असल्याचे पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. सोमवारपासून विधीमंडळाचे अधिवेशन सुरू होत आहे. त्याआधीच मुंडे आपला राजीनामा देणार असल्याचे करुणा शर्मा यांनी म्हटले.

करुणा शर्मा यांनी काय म्हटले?

 

 

करुणा शर्मा यांनी म्हटले की, मला आतून माहिती मिळाली, दोन दिवसांआधी त्यांचा राजीनामा लिहून घेतला आहे. धनंजय मुंडे यांनी स्वत: सांगितले होते की वाल्मिक कराड चौकशीअंती दोषी निघाला तर मी स्वत: राजीनामा देईल. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यासमोर कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे सोमवारी अधिवेशनाआधी त्यांचा राजीनामा शंभर टक्के होणार आहे. अजितदादा अधिवेशनाच्या आधीच धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढणार आहेत, अशी मला खबर लागलेली आहे.

 

वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना फाशीच झाली पाहिजे : करुणा मुंडे

 

 

संतोष देशमुथ हत्या प्रकरणात कुणीही असेल तरी त्याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे, असे धनंजय मुंडे सातत्याने सांगत होते. काल सीआयडीने दोषारोपपत्र दाखल केले आहे. आरोपींची कृत्ये त्यातून समोर आली आहेत. आता लवकरात लवकर सुनावणी पूर्ण करून त्यांना फाशीच होईल हे पाहिले पाहिजे आणि त्यांना फासावरच लटकवले पाहिजे, अशी मागणीही करुणा मुंडे यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -