संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता तीन महिन्यांहून अधिक कालावधी (apology)उलटला आहे. या प्रकरणातील मास्टरमाइंड असलेला वाल्मिक कराड हा अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचा आहे. त्यामुळे मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून होत होती. अखेर आज, 4 मार्चरोजी धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली.देशमुख हत्येच्या 82 दिवसांनी धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या पहिल्या प्रतिक्रियेत या निर्णयाचे समर्थन केले. मात्र त्याचबरोबर त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “हा राजीनामा आधीच यायला हवा होता. खरं तर त्यांनी मंत्रीपदाची शपथच घ्यायला नको होती!”
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर भाष्य करताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “राजीनामा आधीच द्यायला हवा होता. त्यामुळे कुटुंबाच्या भावनांची थोडी तरी जपणूक झाली असती. आज राजीनामा दिला गेला हे योग्य आहे, पण जर त्यांनी मंत्रीपद स्वीकारलेच नसते, तर हे सर्व पुढे घडले नसते.”त्या पुढे म्हणाल्या,(apology)“राजीनामा आधीच द्यायला हावा होता. त्यामुळे गरीमा राखता आली असती. त्या परिवार आणि कुटुंबाच्या दुखापुढे राजीनामा ही काहीच गोष्ट नाही. त्यांनी घेतला. मला वाटतं ते देर आये दुरुस्त आए”
पुढे पंकजा मुंडे यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची माफी देखील मागितली. दरम्यान, संतोष देशमुख यांची अतिशय क्रूर हत्या झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. त्यातच काल रात्रीच संतोष देशमुख यांच्या हत्येचे काही धक्कादायक (apology)फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. या व्हायरल फोटोमुळे राजकीय हालचालींना देखील लगेच वेग आला. रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे आणि अन्य नेत्यांची बैठक देवगिरी बंगल्यावर पार पडली. त्यानंतर आज सकाळी धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा पाठवला. मुख्यमंत्र्यांनी देखील तो त्वरित स्वीकारला.