चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंडची टीम आमने-सामने असणार आहे. पहिल्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने शानदार विजय मिळवला. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली. न्यूझीलंडचा विजय हा टीम इंडियासाठी वाईट बातमी आहे. कारण यामागचा इतिहास नक्कीच भारतीय फॅन्सची चिंता वाढवू शकतो. चॅमिपयन्स ट्रॉफी 2025 च्या साखळी फेरीत भारताने न्यूझीलंडवर मोठा विजय मिळवला. पण फायनलमध्ये न्यूझीलंडने नेहमीच टीम इंडियाला त्रास दिला आहे. न्यूझीलंडच फायनलमध्ये पोहोचण टीम इंडियासाठी वाईट बातमी का आहे? ते जाणून घ्या.
टीम इंडिया एक मजबूत टीम आहे, या बद्दल कुठलीही शंका नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सलग चार मॅच जिंकून त्यांनी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. पण न्यूझीलंडला कमी समजणं चुकीच ठरेल. खासकरुन न्यूझीलंडचा ICC टुर्नामेंटसच्या फायनलमध्ये भारताविरुद्ध 100 टक्के विजयाचा रेकॉर्ड आहे.
आयसीसी टुर्नामेंटमध्ये कोण-कोणावर भारी
15 ऑक्टोंबर 2000 रोजी पहिल्यांदा आयसीसीच्या फायनलमध्ये भारत-न्यूझीलंडच्या टीम आमने-सामने होत्या. त्यावेळी न्यूझीलंडने टीम इंडियाचा चार विकेटने पराभव केला होता. या मॅचमध्ये भारताने प्रथम फलंदाजी करताना 264 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात किवी टीमने 2 चेंडू राखून विजय मिळवलेला. त्यानंतर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये 2021 साली दोन्ही टीम्स आमने-सामने आल्या. त्यावेळी पुन्हा एकदा न्यूझीलंडच्या टीमने 8 विकेटने सामना जिंकला. आयसीसी वनडे टुर्नामेंटच्या 2 सेमीफायनलमध्ये भारताने न्यूझीलंडला पराभूत केलेलं आहे.
टीम इंडियाचा रेकॉर्ड काय?
आयसीसीच्या वनडे टुर्नामेंटमध्ये भारत-न्यूझीलंड दोन्ही टीम्समध्ये नेहमीत रंगतदार सामने झाले आहेत. आयसीसी वनडे टुर्नामेंटसमध्ये भारताने न्यूझीलंडला 8 मॅचेसमध्ये हरवलं आहे. 7 सामन्यात न्यूझीलंडला विजय मिळाला आहे. चांगली बाब ही आहे की, मागच्या तीन आयसीसी वनडे टुर्नामेंट्समध्ये भारताने न्यूझीलंड विरुद्ध विजय मिळवला आहे. याच टुर्नामेंटच्या ग्रुप स्टेजमध्ये भारताने न्यूझीलंडला 44 धावांनी हरवलं. भारताने प्रथम फलंदाजी केली. निर्धारित 50 ओव्हर्समध्ये 249 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडची टीम 205 रन्सवर ऑलआऊट झाली. वरुण चक्रवर्तीने 42 धावा देऊन पाच विकेट काढल्या.