संजय गांधी निराधार योजना कार्यालयामार्फत विविध योजनांसाठी नवीन लाभार्थ्यांचे अर्ज १७ मार्चपर्यंत महा-ई-सेवा केंद्रामार्फत ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येणार आहेत.
तरी सर्व योजनांच्या अर्जाच्या आवश्यक कागदपत्रासह स्थळ प्रती महा ई सेवा केंद्रामार्फत या कार्यालयाकडे जमा कराव्यात. १७मार्च नंतर प्राप्त अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत याची सर्व सबंधीतांनी नोंद घ्यावी, असे आवाहन अप्पर तहसिलदार सुनिल शेरखाने यांनी केले आहे.